आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या इतर सहकार्यांसोबत रक्षाबंधनाचा सोहळा पार पाडला . यावेळी आपल्या मनोगततून त्यांनी उत्सवांना सीमेवर देशाचे रक्षण करीत असलेले सैनिक घरी परत येऊ शकत नाही त्यामुळे देशवासीयांकडून त्यांना राख्याच्या रूपाने प्रेम,आदर, माया मिळाले की खूप आनंद होतो.व आमचे आत्मबल अजून वाढते.

राखी म्हणजे केवळ रेशमी धागा नसून त्या धाग्यापासून एक वेगळी मानसिक शक्ती मिळते, असे सांगितले. यासाठी सचिव आमदार शंकर जगताप, उपाध्यक्ष विजय जगताप, सूर्यकांत गोफणे, डॉ.विकास पवार, प्रा.प्रताप बामणे, सदस्या स्वाती पवार, प्राचार्य इनायत मुजावर सर्व शिक्षक वृंद यांच्या शुभेच्छा सह दत्ता कांबळे व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.


