महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.०१ नोव्हेंबर) : मराठा आरक्षण(Maratha Rservation) या विषयाभोवती मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव ग्रामस्थ आणि रहिवासी मराठा बांधव एकवटले आहेत. यावेळी ग्रामस्थांच्या बरोबर शंकर पांडुरंग जगताप हे ही या उपोषणाला बसल्याचे दिसून आले.
मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.या उपोषणाला पाठिंबा व मराठा आरक्षण तातडीने मिळावे यासाठी पिंपळे गुरव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले आहे, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज,एक मराठा लाख मराठा, “एकच मिशन- मराठा आरक्षण” याविषयी घोषण देण्यात आल्या.
यावेळी पिंपळे गुरव भागातील सर्व समाजबांधव मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एकत्र झाल्याचे पहायला मिळाले.
शंकर जगताप म्हणाले की, ”मराठा आरक्षण” या विषयावर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. त्यासाठी सर्व पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. सरकारने कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. राज्यात सुरू असलेल्या हिंसक घटना अयोग्य असून, सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाची बदनामी करणाऱ्या आहेत. राज्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.
दरम्यान, पिंपळे गुरव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समजाच्यावतीने आज एकदिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणात ग्रामस्थांसोबत सहभागी झालो. ‘गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला’ आणि आंदोलनकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. उपोषणामध्ये सहभागी सर्व मराठा समाजबांधवांचे आभार व्यक्त करतो. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. पोलीस प्रशासनानेही संयमाने आंदोलकांची भावना समजून घ्यावी, असे आवाहनही शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑक्टोबर :- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आधार…
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…