Google Ad
Uncategorized

सप्तरंगाची उधळण करत पुण्याच्या ऐश्वर्य कट्ट्यावर कर्तृत्ववान नव दुर्गांचा अप्पा रेणूसे परिवाराच्या वतीने सन्मान…!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ ऑक्टोबर) : नवरात्रीचे दिवस नवरंगात न्हाऊन निघत असताना आजचा ऐश्वर्य कट्टाही त्याला अपवाद नव्हता. सप्तरंगाची उधळण होत असताना आज कट्ट्यावर मात्र कर्तृत्वाचे नऊ रंग उतरले होते…!

योगायोग असा की, आजच ऐश्वर्य कट्ट्याला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे या दुहेरी आनंदात आजची सकाळ न्हाऊन निघाली…! आज कट्ट्यावर नऊ कर्तुत्व शालिनी भगिनी उपस्थित होत्या त्यांचे कौतुक करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय ज्योतीताई अंकुश काकडे आवर्जून आल्या होत्या.

Google Ad

नुकत्याच चीनमध्ये झालेल्या आशियायी क्रिडा स्पर्धांमध्ये भारताला कबड्डी या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवून दिलेल्या स्रेहल शिंदे, हॉटेल ग्रीन फिल्डच्या संचालिका व ग्रीन एकर्स स्कूलच्या विश्वस्त मा. विभावरी सणस, भारताच्या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू व भारताला १३ सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या खेळाडू मा. प्रियांका बोरा, साईनाथ हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. सीमा मांगडे, राजकीय क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या मा. राणी भोसले, अभिजीत इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालिका मा. नुतन गुपचूप, ‘मेरी सहेली’ संस्थेच्या संचालिका मा. देवी तन्ना, सकाळच्या धडाडीच्या पत्रकार मा. रीना महामुनी, काँग्रेसच्या धडाडीच्या पदाधिकारी मा. अर्चना शहा, प्रख्यात ड्रेस डिझायनर मा. अश्विनी भोसले या नवदुर्गांची या वेळी विशेष उपस्थिती होती.

सर्व मान्यवर नवदुर्गांना फेटे बांधण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत प्रथमत: देवीचा जागर आणि आरती करण्यात आली. या सर्वांचे आदराने स्वागत करण्यात आले. या वेळी लहान मुली नवदुर्गांच्या वेशामध्ये अगोदरच उपस्थित होत्या. हे सरप्राईज सर्वानाच आवडले.

शंखनाद करून मान्यवरांचे स्वागत झाले. ज्योतीताई काकडे, ऐश्वर्या रेणुसे व चेतना संचेती यांच्या हस्ते मानाचे वस्त्र, श्रीफळ, मोत्याची माळ आणि सन्मानपत्र देऊन सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.

इतक्या छान पद्धतीने महिलांचे स्वागत आणि सन्मान केल्याबद्दल सर्वांनीच मनापासून आभार मानले. त्यांच्याशी साधलेल्या संवादामध्ये त्यांनी मोकळेपणाने आपल्या आयुष्याचा प्रवासही उलगडला.

आज झालेला सन्मान हा माझ्या माहेरचा सन्मान असल्याची भावना स्रेहल शिंदे यांनी व्यक्त केली. भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर भारतात परतल्यावर विमानतळावर वडिलांच्या डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंची हृद्य आठवण त्यांनी सांगितली. वडिलांच्या पाठिंब्यामुळे सर्व धुरा आपण सांभाळू शकत असल्याने विभावरीताईनी सांगितले. चार वर्षे अमेरिकेत जॉब केल्यानंतर आता भारतात उद्योजिका म्हणून प्रवास सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.

पाचवीपासून व्हॉलीबॉलची आवड असल्याने याच खेळात करियर केले. त्यातून भारताला १३ सुवर्णपदके मिळवून दिली, त्याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रियांका बोरा यांनी सांगितले. राजकीय पार्श्वभूमी नसताना पतीने या क्षेत्रात पाय रोवून उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला असे राणी भोसले यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मन की बात मध्ये साधलेल्या संवादाची आठवणही त्यांनी सांगितली. वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच अभिजीत इंडस्ट्रीजची धुरा आज सांभाळू शकत असल्याचे नुतन गुपचूप यांनी सांगितले. अर्चना शहा यांनी आपला राजकीय प्रवास उलगडला. लिखाणाची आवड असल्याने पत्रकारितेत आले आणि इथेच रमले अशी माहिती पत्रकार रिना महामुनी यांनी दिली. डिझायनिंगच्या क्षेत्रात आपण कारकीर्द करू शकलो याचे श्रेय अश्विनीताई यांनी ऐश्वर्या रेणुसे यांना दिले.

 

मा. अंकुशजी काकडे यांच्यासमवेत ४० वर्षे यशस्वी रीतीने केलेल्या संसाराचे गुपीत ज्योती काकडे यांनी दिलखुलासपणाने उलगडले. ऐश्वर्या रेणुसे यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. दिलीप जगताप, सचिन डिंबळे व पत्रकार पराग पोतदार यांनी या या सर्व नवदुर्गांशी संवाद साधला.

केक कापून ऐश्वर्य कट्ट्याच्या द्वितीय वर्धापनाचा आनंदही सगळ्यांनी मिळून साजरा केला. या वेळी अप्पा रेणुसे मित्र परिवारातील सर्वजण आवर्जून उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!