Google Ad
Editor Choice

स्वा.सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभागाचे वतीने गेली १३ वर्षे तळेगाव जवळील घोरावडेश्वर टेकडीवर “हरित घोरवडेश्वर प्रकल्प”

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील घोरवडेश्वर डोंगरावर स्वा.सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभागाचे वतीने गेली १३ वर्षे तळेगाव जवळील घोरावडेश्वर टेकडीवर “हरित घोरवडेश्वर प्रकल्प” राबविला जातो.

आज रविवार (दि.१ मे) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त, निसर्गसेवा करण्यात आली. पार्वती कुंड व गणेश कुंड परिसरात व गंगा टाकी परिसरात छोट्या झाडांना पाणी दिले (२) लक्ष्मी कुंड परिसरात गेल्या वर्षी सापडलेली छोट्या कुंडातील गाळ /माती काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या सामाजिक कार्यास नेहमी सहाय्य करणारे पिंपळे गुरव-नवी सांगवी येथील विजयशेठ जगताप मित्र मंडळाचे कार्यकर्ते भाऊसाहेब जाधव, दत्तात्रय जाधव, गिरीष पाटील, सुरेश शिंदे या कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी स्वा. सावरकर मंडळ निसर्ग मित्र मंडळचे श्री विजय सातपुते आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Google Ad

या सर्वांच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप लवकरात लवकर आजारातुन बरे व्हावे म्हणून अमरजाई देवीला पार्थना करण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!