Google Ad
Uncategorized

‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’च्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत ६०० विद्यार्थ्यांना … स्कुल बॅग , प्रमाणपत्र , वही व पेन तर काहींना टॅबलेट फोन आणि चषक देऊन सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .३१ जुलै) : शनिवार दि.३०/०७/२०२२ रोजी पिंपळे सौदागर येथील बासुरी बँक्वेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला . या सोबतच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा देखील गौरव समारोह पार पडला . यावेळी उपस्थित ६०० विद्यार्थ्यांना स्कुल बॅग , प्रमाणपत्र , वही व पेन देऊन सन्मानित करण्यात आले आणि याच विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक इयत्ता आणि शाखेमधील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना (एकूण १८ विद्यार्थ्यांना) या भेटवस्तू व्यतिरिक्त प्रत्येकी एक टॅबलेट फोन आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

दहावी बारावी नंतर काय ? या प्रश्नाने बरेचसे विद्यार्थी गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असतात तसेच कोणत्या क्षेत्रात आणि किती संधी उपलब्ध आहेत , विविध क्षेत्र निवडीची प्रक्रिया , अभ्यासक्रम , त्यानुसार भविष्यातील संधी यासगळ्या विषयाची सविस्तर माहितीचा अभाव विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये दिसून येते . यामुळे श्री शत्रुघ काटे यांनी पुढाकार घेत श्री जिमी पंडिता यांचे “करियर गायडंस “ शिबिराचे आयोजन केले होते आणि श्री जिमी पंडिता यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले .

Google Ad

व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना या स्पर्धात्मक जगात आपले भविष्य आणि स्वप्ने कशी पूर्णत्त्वास न्यावे याबाबत आपले अनमोल विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.

यावेळी बोलताना ‘ शत्रुघ्न (बापू) काटे’ म्हणाले, “शिक्षणातून पुढील येणाऱ्या पिडीच कल्याण होतं आणि हे स्पर्धेचं युग आहे. पास झालेल्या विद्यार्थी यांनी आताच योग्य निर्णय घ्यावा , यशाकडे जाणारा मार्ग निवडावा कारण हा आयुश्याला दिशा देणारा प्रसंग असतो .आयुष्याच्या या टप्प्यावर निर्णय घेताना चुकलात तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे अश्यक्य आहे. जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर यांची चरित्रे आयुष्यात एकदातरी अभ्यासावे , आचरण करावे कारण त्यातून मिळणारी स्फूर्ती , ऊर्जा तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवर घेऊन जाईल’.

यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मयुरीजी मेहता (जी के गुरुकुल,प्राचार्य ) , शीतलजी कामत (वेबगेयर स्कुल,प्राचार्य ) , सौ.सुरेखा जोशी (प्राचार्य आण्णासाहेब मगर स्कुल ) ,श्री.अरुण चाबुकस्वार (संस्थापक अध्यक्ष्य ,न्यू सिटी प्राईड स्कुल ), श्री.तानाजी अंकुशराव (निवृत्त प्राचार्य, आण्णासाहेब मगर स्कुल ) , उषाजी भारद्वाज (निवृत्त शिक्षिका केंद्रीय विद्यालय ) , श्री.शाकूर सय्यद (निवृत्त प्राध्यापक,MUCC कॉलेज ) ,श्री. जॉन सर (शिक्षक) इ.मान्यवरांना सन्मान चिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे आयोजक श्री शत्रुघ्न काटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चंद्रकांत कणसे , डॉ.सौ.सरस्वती कणसे , पोलीस निरीक्षक श्री.सुनील टोणपे साहेब,ऍड.श्री.राजेश जाधव ,पवना सह.बँक उपाध्यक्ष श्री.जयनाथ काटे,उन्नती फाउंडेशन अध्यक्षा सौ.कुंदाताई भिसे ,श्री कैलास कुंजीर , श्री.संजय भिसे, सौ.चंदाताई भिसे ,श्री प्रविण कुंजीर , श्री सुभाष भिसे , श्री बाळकृष्ण परघळे , श्री विकास काटे , श्री विकास भोला काटे , श्री मनोज ब्राह्मणकर , श्री दिपक गांगुर्डे ,श्री समिर देवरे ,श्री.मनोज यादव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.उषा भारद्वाज आणि सागर बिरारी यांनी केले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!