Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथे शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने … जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न! जेष्ठ नागरिकांना एस टी बस स्मार्ट कार्डचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपळे गुरव येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज ‘शामभाऊ जगताप युवा मंच’च्या वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना जेष्ठ नागरिक कार्ड, एसटी बस स्मार्ट कार्ड आणि भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मा.नगरसेवक अतुल शितोळे, नगरसेवक नवनाथ जगताप, मा.नगरसेवक राजू लोखंडे, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप, शिवाजी पडुळे, मा.नगरसेविका शोभाताई आदियाल, मा नगरसेविका सु्षमा तनपुरे, माधुरीताई गरुड, मराठवाडा विकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, तृप्तीताई जवळकर, उज्वलाताई ढोरे (महिला उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड), अश्विनीताई शामभाऊ जगताप, संदेश नवले आदी मान्यवर व परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Google Ad

सदर कार्यक्रमाचे आयोजन शामभाऊ जगताप युवा मंच, तानाजी जवळकर, अमर भाऊ आदियाला, डीगु जगताप, शाम भाऊ जगताप मित्र परिवार पिंपळे गुरव मधील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!