महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑगस्ट) :- सातारा मित्र मंडळ सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरव पुणे व मराठवाडा जनाविकास संघ पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील इर्शाळ वाडी आपत्ती ग्रस्त कुटुंबांना साहित्याची मदत करण्यात आली.
यावेळी सातारची कन्य आमदार ‘श्रीमती अश्विनी जगताप’ यांचा मंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी सातारा मित्र मंडळाला यासाठी आवाहन केले होते त्याप्रमाणे आज मंडळाने त्याची पूर्ती केली. असे सातारा मित्र मंडळ सांगवी चे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी सांगीतले. मंडळ स्थापन होऊन सहा वर्ष झाली व मंडळाचे ब्रीद वाक्य आहे ‘समाज सेवा हीच ईश्वर सेवा‘ आहे.
त्याप्रमाणे मंडळाने या सहा वर्षात अनेक पूरग्रस्तांना, लोकबिरादरीला, गरीब होतकरू विद्यार्थ्याना व लोकांना,आश्रमाला आर्थिक व सामाजिक मदत केली आहे. या मदती साठी मराठवाडा जनविकस संघाचे अध्यक्ष, समाजसेवक व वृक्षमित्र अरूण पवार, व सातारा मित्र मंडळाचे सदस्य व उद्योगपती सूर्यकांत गोफणे व मंडळाच्या सदस्यांचे मोलचे सहकार्य लाभले.
इर्शाळवाडी साठी देण्यात आलेल्या साहित्यामध्ये ४० ब्लँकेट,९० रजई, १०० सतरंज्या,८० बेडशीट,६० टॉवेल,४० सॉक्स,२५ सॅक,११ छत्री,४०० साड्या,७० महीला व मुलींचे ड्रेस,६० लहान मुलांचे ड्रेस,५० स्वेटर,३० नॅपकीन इ. साहित्य होतें असे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले.यावेळी संस्कार प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. मोहनराव गायकवाड, मंडळाचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष अरविंद जाधव, सचिव सोमनाथ कोर, सदस्य लक्ष्मण शिंदे, उमेश पाटील, नवनाथ कदम, महिला सदस्या सविता माने या कार्यक्रमास उपस्थित होते. मंडळाचे सचिव यांनी प्रास्तविक केल व आभार कार्याध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले.