Google Ad
Editor Choice

टाकवे गाव येथे राजमाता जिजाऊ यांच्या ३४८ व्या स्मृतिदिनानिमित्त राजमाता फाउंडेशन व टाकवे गावचे ग्रामस्थ यांच्या वतीने वृक्षारोपण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : टाकावे परिसरातील निसर्ग हा हिरव्यागार वृक्षांची छाया देत नटला असला तरी भविष्यात या पर्यावरणाला प्रदूषणामुळे बाधा होण्याची दाट शक्यता आहे, याचे महत्त्व जाणून दि. १७ जून २०२२ रोजी सकाळी ९ .०० वा नवीन बैलगाडा घाट , टाकवे गाव येथे राजमाता जिजाऊ यांच्या ३४८ व्या स्मृतिदिनानिमित्त राजमाता फाउंडेशन व टाकवे गावचे ग्रामस्थ यांच्या वतीने असंख्य रोपांचे रोपण करून , तसेच वसुंधरेचे रक्षण पर्यावरण दिंडी सोहळा मोहीम राबविण्यात आली.

यावेळी माजी नगरसेविका व अध्यक्ष राजमाता फाऊंडेशन सौ. सुरेखाताई साळुंखे, टाकवे गावचे सरपंच- भूषण आसवले, उपसरपंच- सौ.सुवर्णा आसवले, सोसायटी चेरमन पांडुरंग मुडवे, महिला सदस्य सौ . अंजली कुलकर्णी, नीलिमा अहिरराव, सुनीता वाडेकर, माधुरी सोनवणे, सुनीता मगदुम, राजश्री पाटील, सुनीता कुंजीर, राजश्री कुंजीर, अश्विनी भटियाँ, नंदा श्रीखंडे, विधा भोंडवे, नम्रता आडकर, अर्चना वैरागे ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Google Ad

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजनचे मूल्य प्रत्येकाने ओळखले आहे. ऑक्सिजन वृद्धीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, पर्यावरणाला वाचवण्यासाठी वायू, जलप्रदूषण रोखले पाहिजे. केवळ वृक्ष लावून पर्यावरणाचा समतोल राखता येणार नाही, तर त्यासाठी त्याचे संवर्धन, करणे गरजेचे आहे, तरच हिरव्यागार टाकावे परिसराला मोकळा श्वास घेता येईल.

सौ. सुरेखाताई साळुंखे (अध्यक्ष राजमाता फाऊंडेशन )

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!