Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत … पिंपळे गुरव भागात सुरू असलेल्या कामाचा आयुक्तांनी केला धावता पाहणी दौरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८जून) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे गुरव परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी आयुक्त राजेश पाटील यांनी केली. या पाहणी दौऱ्यात सोबत स्थानिक नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे यांनी पाहणी केली. यावेळी प्रभागातील पदपथावर, रस्त्यावर पडलेला राडा रोडा हटविण्यात यावा, रस्त्यांवरील डांबरीकरण त्वरित करण्याच्या सूचना आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

पिंपळे गुरव मधील प्रभाग क्र. २९ मधील स्मार्ट सिटी कार्यालय, साठ फुटी रोड येथील मुक्तांगण लॉन्स समोर नदी किनारी टाकण्यात येत असलेल्या ड्रेनेज लाईनची पाहणी, काटे पुरम चौक येथील मयुर नगरीला लागून असलेल्या रामनगर मधील रस्त्याची पाहणी, एम. के. हॉटेल चौकातील ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर पाईपलाईन आदी कामकाजाची पाहणी यावेळी आयुक्त आणि प्रतिनिधी करताना दिसून आले.

Google Ad

यानंतर औंध बीआरटी मार्ग, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथील परिसरातील विकास कामांची पाहणी करण्यात आली.

येथील स्थानिक नगरसेवक तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष येथील कामकाजाची पाहणी करताना येथील रस्ते त्वरित सुरळीत करून डांबरीकरण करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे आपल्या प्रभागात आयुक्त पाहणीसाठी आल्याने त्यांच्या भेटीसाठी येत असताना रस्त्यात सुरू असलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर खडी वाळू पसरल्यामुळे त्यांचे स्वतःचे दुचाकी वाहन घसरून दुखापत झाली. यावेळी त्यांनी आयुक्तांना आमचीच ही अवस्था होत असेल तर येथील नागरीकांची काय परिस्थिती होत असेल असे याप्रसंगी आयुक्तांपुढे गाऱ्हाणे गायले.

यावेळी आयुक्त राजेश पाटील म्हणाले, महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामात येणाऱ्या अडचणींची पाहणी, झालेल्या कामाची पाहणी, आदेश दिल्याप्रमाणे पदपथ तसेच रस्त्यांवरील राडारोडा हटविण्यात आला आहे का नाही याबाबत पाहणी करण्यासाठी आलो आहे.

मागील आठवड्यातच आयुक्त स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांबाबत तसेच विकास कामात येणाऱ्या अडचणी पाहण्यासाठी येणार होते. परंतु पावसामुळे दौरा रद्द करून सोमवारी त्यांनी पाहणीसाठी येत असल्याचे सूचित केले होते. असे विजय बांदल, स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक यांनी सांगितले.

याप्रसंगी स्मार्ट सिटी महाव्यवस्थापक अशोक भालकर , कार्यकारी अभियंता मनोज सेठिया , महाव्यवस्थापक नितीन कदम , उपमहाव्यवस्थापक केशव लावंड , प्रकल्प व्यवस्थापक विजय बांदल , पाणीपुरवठा विभाग राहुल पाटील उपस्थित होते .

आयुक्त येणार होते याबाबत आम्हाला कोणतीही माहीती मिळाली नाही. अचानक आयुक्त प्रभागात आल्याचे समजताच तात्काळ त्यांच्या भेटीसाठी पोहचलो.
राजेंद्र राजापुरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष

आयुक्त अचानक आल्याचे समजताच मी त्यांना भेटून प्रभागातील कामकाजा संदर्भात माहिती दिली. पावसाळ्यात रस्ते डांबरीकरण करून देण्यात यावे यासाठी विनंती केली.
अंबरनाथ कांबळे, स्थानिक नगरसेवक

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!