Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये  दर सोमवारी होणारी जनसंवाद सभा होणार मंगळवारी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये  दर सोमवारी जनसंवाद सभा आयोजन करण्यात येते. मात्र उद्या सोमवार  दि. १६ मे रोजी  बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने सोमवारी होणारी जनसंवाद  सभा मंगळवार दि. १७ मे रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत  होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन येत आहे. आतापर्यंत आठ सभा पार पडल्या असून यामध्ये सुमारे एक हजारपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. जनसंवाद सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये, अ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता श्रीकांत सवणे (बी.आर.टी.एस), ब क्षेत्रिय कार्यालय – बांधकाम परवानगी सह शहर अभियंता मकरंद निकम,

क क्षेत्रिय कार्यालय – भूमी आणि जिंदगी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ड क्षेत्रिय कार्यालय – नागरवस्ती उपआयुक्त अजय चारठाणकर, इ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता सतीश इंगळे, फ क्षेत्रिय कार्यालय – प्र.अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप, ग क्षेत्रिय कार्यालय – उप आयुक्त तथा प्र. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, ह क्षेत्रिय कार्यालय – पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवत आहेत.

संबंधित क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे विभागस्तरावरील अधिकारी या सभेस उपस्थित राहतात. मुख्य समन्वय अधिकारी हे जनसंवाद सभेसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची तक्रार नोंदवून घेऊन शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिका-यांशी चर्चा करून तक्रारींचे निराकरण करतात.

 

 

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

3 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

10 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

23 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago