Google Ad
Editor Choice

स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांचा गौरव!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑगस्ट २०२१) : कोरोना काळामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. तसेच शहर स्वच्छतेसाठी हि सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांचा गौरव समारंभ प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते कोरोना विषयक नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या समारंभास उपमहापौर नांनी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे नगरसदस्य तुषार हिंगे, विलास मडीगेरी, केशव घोळवे, संतोष कांबळे, संतोष लोंढे, शैलेश उर्फ शैलेद्र मोरे, अॅड. मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या झामाबाई बारणे, अनुराधा गोफणे, माधवी राजापुरे, निर्मला गायकवाड, निर्मला कुटे, कमल घोलप, शारदा सोनावणे, अनुराधा गोरखे, शारदा सोनावणे, सुनिता तापकीर, सअतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

Google Ad

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या प्रकारे इंग्रजांना देशातून पळवून लावून देश स्वतंत्र करून दिला त्याप्रमाणे शहरातील नागरिकांनी कोरोनाला पळवून लावले व त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला कोरोना संकटावर यशस्वीपणे मात करता आली. आगामी काळामध्ये शहराला स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्याचे नियोजन असून यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. शहरातील कचरा समस्या सोडविणेसाठी नागरिकांनी घरातील कच-याचे विभाजन करावे असे आवाहनही यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

आयुक्त राजेश पाटील यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना नागरिकांना देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. आयुक्त पाटील म्हणाले, आपल्या जवळच्या देशांची परिस्थिती पहिली कि आपण भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात राहत असल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजावेसे वाटते. कोरोनाच्या संकटाने लोकांना नव्याने माणुसकी शिकवली. पिंपरी चिंचवड शहराला राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी महानगरपालिका प्रयान्ताशील असून या शहराला सुंदर व स्वच्छ शहर करण्यासाठी लोक सहभागाची आवश्यकता आहे.

शहरातील नदी,नाले प्रदूषणमुक्त करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट असल्याचेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाले, नागरिकांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड शहर कोरोना संकटावर मात करण्यात यशस्वी झाले. पिंपरी चिंचवड शहराची क्रिडा नगरी अशी ओळख करण्यासाठी तसेच शहरामध्ये विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय सामने भरविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचेहि त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आशियाई पॉवर लिफ्टिंग खेळाडू प्रतीक पवार, अश्विनी कपोत्ते, सदाशिव बोराटे, स्वानंद राजपाठक, डॉ.कविता हिंगे, धनंजय शेंड्बाळे, संजय भोसले, ह.भ.प. सदानंद बग, डॉ. सुभाष कुलकर्णी, निलेश लोखंडे, डॉ. श्रीम. माधुरी शिंगाडे, यश चीनावले, डॉ. भारत शहा, डॉ/ रोहित शुक्ला, संस्कृती गोडसे, श्वेता रतनपुरा, अंकिता शर्मा, रवींद्र पाटोळेम अशोक कांबळे, विद्या जोशी, अरुण चाबुकस्वार, स्वाती कुंभार, प्रगती गायकवाड, डॉ. अभिनंदन एम.जे., जयप्रकाश गावडे, तानाजी काटे, शांताराम सुर्वे, संतोष म्हात्रे, बाळासाहेब रोकडे, रामप्रकास बरई,

संदीप तापकीर, सीता किरवे, प्रा.डॉ. सोमनाथ धोंडे, सार्थक मटाले, गिरीजा लांडगे, मंगेश खांडेकर, डॉ. अविनाश वैद्य, नमिता सराफ, योगेश शिरसाठ, बाळाजी जाधव, झुम्बरलाल पाटील, शंकर शुक्ला, दिगंबर ढोकले, राधाकृष्ण नायर, किरण दहिवळ, त्र्यंबक भागवत, राधाकांत कांबळे, सतीश फुगे, अशोक बिचुकले, राजेंद्र चोथे, वाल्मिक कुटे, शिवलिंग ढवळेश्वर सिद्धी शिर्के, डॉ. उज्वला बेंडे, आशिष माने, मंगल भन्साळी, नंदकुमार सगणे, प्रमोद ठाकर, डॉ. मोहन गायकवाड, शशिकुमार टोपे, अश्विनी वाघचौरे, तेजस्विनी ढोमसे, सचिन लोंढे, सोनल बुंदेले, वामनराव दांडे, केतन कुंजीर आदींचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर नगरसदस्य केशव घोळवे यांनी आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

26 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!