Google Ad
Editor Choice Maharashtra

दिलदार … जिगरबाज मयुर शेळकेचा ‘पार्थ पवार फौंडेशन’च्या वतीने … नगरसेवक ‘राजू बनसोडे’ यांनी शोर्य गौरव पुरस्कार देऊन केला सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : वांगणी येथे तैनात असलेला पॉइंट्समन मयूर शेळके याने प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव वाचवला. आता मयुरने आणखी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जिगरबाज मयुरचा दिलदारपणा मोठ्या मोठ्या श्रीमंतांनी लाजवले असा आहेय यासाठी त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच.

मयूरने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या कामगिरीबद्दल रेल्वेकडून त्याला ५० हजारांचं बक्षीस देण्यात आले आहे. मयूरने यातील २५ हजार रुपये संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या दिलदारपणाने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.

Google Ad

देवदूत मयुरला सलाम

अंध महिलेचा आधार असलेला तिचा मुलगा हातातून सुटुन रेल्वे रुळावर पडला त्याला वाचविण्यासाठी आलेल्या देवदूतसमान पाॅईंटमन मयुर शेळके याने स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत धैर्य आणि धाडस दाखवत एका अंध आईच्या चिमुकल्याचे रेल्वे रुळावर प्राण वाचवले.

या अभिमानास्पद व जिगरबाज कृत्याबद्दल मयुर शेळके याचा कर्जत येथील वांगणी रेल्वे स्थानकावर पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने शौर्य गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह व रोपटे देऊन कार्यक्षम नगरसेवक ‘राजाभाऊ बनसोडे’ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित स्टेशन मास्तर चंदन कुमार पाॅईंट्समन संदेश खाडे,शशिकांत धुळे,राजू जगताप,सुशांत वंजारी,जाफर शेख,सिद्राम म्हेत्रे,लक्ष्मण उप्पार उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!