Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आज आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडली अकरावी जनसंवाद सभा … सुमारे १२८ नागरिकांनी घेतला सहभाग केल्या या तक्रारवजा सूचना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० मे २०२२) : महापालिकेच्या वतीने आज आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या अकराव्या जनसंवाद सभेत सुमारे १२८ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार जनसंवाद सभांचे आयोजन केले जाते. आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यात अग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे २६१७१३१३१३२७ आणि १२ इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

Google Ad

या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणेबांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकमभूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशीनागरवस्ती विभागाचे सहाय्यक आयुक्त उमाकांत गायकवाडसह शहर अभियंता सतीश इंगळेअतिरिक्त आयुक्त उल्हास जगतापउप आयुक्त चंद्रकांत इंदलकरपर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.

आज पार पडलेल्या आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह स्थापत्यजलनिसाःरणपाणीपुरवठाविद्युतनगररचना विभागांचे अभियंताउद्यानवैद्यकीयआरोग्यकरसंकलन विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. त्यामध्ये पाणीपुरवठा योग्य दाबाने करावावृक्षारोपण करावेपावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईनची कामे करावीआरक्षित मैदाने विकसित करावीअनधिकृत पत्राशेड हटवावेअनधिकृतपणे ड्रेनेज वाहिन्यांना जोडणी केलेल्या मिळकतधारकांवर कारवाई करावीधोकादायक तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी करावीमनपा शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत रेनकोट वाटप करावेनियमानुसार नामकरण झालेल्या वास्तूरस्ते आणि मैदानांचे नामफलक लावावेतसी सी टीव्ही केबलसाठी खोदण्यात आलेले रस्ते वेळेत बुजवावेतअनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावीपदपथ आणि दुकानासमोरील अतिक्रमणे हटवावीपावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुजवावेत आणि उखडलेले रस्ते लवकर दुरुस्त करावेआवश्यक ठिकाणी सुलभ शौचालये उभारावीतरोडवरील पार्किंग ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात आलेली वाहने हटवावीत अशा तक्रारवजा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.

जनसंवाद सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी जनसंवाद सभेचे कामकाज उत्कृष्ट असल्याने जनतेची कामे कमी वेळेत मार्गी लागत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शहरात आता स्वच्छता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेली स्वच्छाग्रह’ मोहिम अत्यंत परिणामकारक ठरत असून नागरिकांनीही या उपक्रमामध्ये निरंतर सहभाग नोंदविल्यास आपले शहर स्वच्छतेसाठी अग्रेसर राहीलअसे मतही नागरिकांनी यावेळी नोंदवले

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!