Google Ad
Editor Choice

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वतीने यावर्षी पुणे ते पंढरपूर वारकऱ्यांकरिता मोफत आरोग्य सेवा … वारकऱ्यांनी घातले भाऊंच्या उत्तम आरोग्यासाठी माऊलीला साकडे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जून) : श्री क्षेत्र देहू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व श्री क्षेत्र आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवा पथक, रुग्णवाहिका व औषधोपचार साहित्य घेऊन गेली चार दिवस झाली पालखीमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य सेवा देत आहेत.

सासवड शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामात नंतर सासवडकरांचा निरोप घेवून माऊलींची पालखी जेजुरी,वाल्हे नंतर निरा स्नान करून लोणंद मुक्कामी आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीसह लाखो वैष्णवांनी टाळ मृदुंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत अवघड दिवे घाट सहज पार केला .

Google Ad

पुणे ते सासवड ही वाटचाल जवळपास ३२ किलोमीटरची असल्याने वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडताना पहायला मिळाली. हडपसर ते वडकी या वाटचालीत अरुंद रस्ता व पोलिसांचे वाहतुकीचे नियोजन ढासळल्याने वारकऱ्यांना वाटचालीत त्रास झाला. त्यातच दुपारी पावणेदोनच्या सुमारास पावसाने काही वेळ हजेरी लावल्याने वारकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. जेजुरीच्या नगरीतही लाखोंचा जनसमुदाय पाहायला मिळत होता.

भाग गेला शीण गेला ,
अवघा झालाशी आनंद ||

असं म्हणत अवघड दिवेघाट चढून माथ्यावर आलेल्या लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांनी माउलींच्या सोहळ्या बरोबर चालून वारीचा आनंद घेतला. या सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. पंढरपूर च्या विठुरायाच्या ओडीने वारकरी चालत असतात त्यात लहानथोर वयोवृद्ध लोक सहभागी झालेले दिसतात, त्या प्रवासा दरम्यान वृद्ध लोकांचे पायी चालण्याने पाय गुडघे दुखणे, सर्दी -खोकला, असे वेगवेगळे आजार होताना असंख्ये वारकरी दिसतात ,या सर्वांना वारीमध्ये लागणारी सर्व औषधे, आरोग्य व्यवस्था चिंचवड चे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वतीने अखंडपणे न थांबता-न थकता देण्यात येत आहे.

आषाढी वारीच्या दोन्ही मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य सेवा चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने पुरवली जात आहे. या आरोग्य सेवा पथकांबरोबर अँब्युलन्सेस, , तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस, सेवाभावी कार्यकर्ते अथक सेवा देत आहेत. यात अनेक वारकरी या आरोग्य सेवेचा लाभ घेतात. यामध्ये वारकऱ्यांच्या सर्व आजारांवर चिकित्सा व औषधोपचर केले जातात.

ता वारीत सेवा देण्याकरिता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर डॉ. मनीषा साबणे, डॉ. देविदास शेलार तसेच परमेडीकल चे विद्यार्थी आपली आरोग्य सेवा देत आहेत. तर संत तुकारामांच्या पालखी मार्गावर डॉ. संतोष चव्हाण, डॉ. माऊली घोलप, भाऊसाहेब जाधव, हरिश्चंद्र गायके तसेच परमेडीकल चे विद्यार्थी वारकर्यांनाया अयोग्य सेवा देत आहेत.

या दोन्ही पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेकरीता दोन रुग्णवाहिका आणि दोन टँकर चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट कडून आपली सेवा देत आहेत. यंदा ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.

आमदार लक्ष्मण जगताप हे मोठ्या आजारातून बरे होवोत ही आमची माऊलींच्या चरणी प्रार्थना, त्यांना उदंड आयुष्य मिळो व दरवर्षी अशीच आमच्या सारख्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य त्यांच्या पदरी पडो.. आम्ही बीड वरून पालखी सोहळ्यात दर वर्षी सहभागी होतो त्या प्रवासात अनेकांना काही ना काही त्रास होतो , भाऊंच्या या आरोग्य सेवेने आमचा आजार दूर झाल्याने परमेश्वराने त्यांच्यावर आलेले विघ्नही दूर करावे!

आत्माराम शास्त्री महाराज, आळंदी

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!