Google Ad
Editor Choice

तलवारबाजी मध्ये राष्ट्रीय विक्रम … ३८ खेळाडूंनी न थांबता सलग ६५ मिनिटे तलवारबाजी करुन ऐतिहासिक कामगिरी करत 🇮🇳 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 🇮🇳 हा राष्ट्रीय विक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२एप्रिल) : मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य* यांच्या वतीने दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी बड्स इंटरनॅशनल स्कूल, नेवाळे वस्ती चिखली, पिंपरी चिंचवड येथे पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने मर्दानी खेळांच्या तलवारबाजी या खेळ प्रकारात विविध वयोगटातील तसेच पिंपरी चिंचवड, पुणे, कोल्हापूर या ठिकाणाहून आलेल्या ३८ खेळाडूंनी न थांबता सलग ६५ मिनिटे तलवारबाजी करुन ऐतिहासिक कामगिरी करत 🇮🇳 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 🇮🇳 हा राष्ट्रीय विक्रम केला.

लहान मुलांनी देखील मोठ्यांच्या बरोबर तितक्याच वेगाने आणि ताकदीने तलवार फिरवली.

Google Ad

कार्यक्रमाचे उद्घाटन बड्स इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष श्री. अभय कोटकर सर यांच्या हस्ते झाले. विक्रम करते खेळाडूंचे कौतुक सहाय्यक पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड आदरणीय प्रेरणा कट्टे मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून केले. परीक्षक म्हणून आशिष आगरवाल सर आणि वैद्यकीय निरीक्षक डॉ. अमृता नवले, डॉ. मुदस्सीर शेख, हे उपस्थित होते.

यावेळी बड्स इंटरनॅशनल स्कूल च्या संचालिका शिल्पा कोटकर मॅडम, मुख्यध्यापिका सुवर्णा खोत मॅडम, प्रांत पोलिस संघ राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी, राष्ट्रीय सैनिक संस्था अध्यक्ष प्रतापराव भोसले, सुदेश गायकवाड सर, डॉ. मुदस्सीर शेख, स्मिता माने मॅडम, शुभांगी सरोते मॅडम, श्रुती गावडे, वेदिका सरोते, सुधीर माने, किशोरी अग्निहोत्री, किरण लवटे, शिवाजी बांदल हे उपस्थित होते.

*राष्ट्रीय विक्रम करत्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :

१) संजय बनसोडे
२) किरण अडागळे
३) अभय नवले
४) अजय नवले
५) केतन नवले
६) स्मिता धिवार
७) रविराज चखाले
८) सुदर्शन सुर्यवंशी
९) अंजली बर्वे
१०) श्रेया दंडे
११) रुपाली चखाले
१२) श्रीसंत पाटिल
१३) शिवम बाबर
१४) भार्गव देढे
१५) अर्सीता सिंग
१६) तनिष्का वाघमारे
१७) अदिती पवार
१८) निक्षीता पाटील
१९) अमृता पाटोळे
२०) वैष्णवी खैरे
२१) साक्षी सैनी
२२) प्रिया सैनी
२३) श्रेयश चव्हाण
२४) मच्छिंद्र पाटील
२५) धनाजी सलगर
२६) सार्थक लोले
२७) नयन शिंपनेकर
२८) कस्तुरी पोतदार
२९) स्वरुप नाळे
३०) ईशा दास
३१) सागर खराडे
३२) गणेश गेजगे
३३) सुमित तांबवेकर
३४) मोहित पाटील
३५) स्वराज अडागळे
३६) अपूर्वा चव्हाण
३७) ऋतुजा पाटील
३८) लकी शिंदे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!