Categories: Editor Choice

लोकमत परिवाराच्या वतीने ‘स्व.जवाहरलाल दर्डा’ यांच्या जयंती निमित्त आयोजित … रक्तदान शिबीरास पिंपळे गुरवमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जुलै) : रामकृष्ण मंगल कार्यालयात पिंपळे गुरव मध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले . या रक्तदान शिबीरास परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेवक सागर अंघोळकर, शशिकांत कदम, नगरसेविका माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष शाम जगताप, शिवाजी कदम, तानाजी जवळकर, अमर आदियाल, सामाजिक कार्यकर्ते पोपट जगताप, प्रा.उमेश बोरसे , अरुण पवार, सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, राजेंद्र राजापूरे, संजय गांधी निराधार योजना सचिव संजय मराठे, फिरोज खान, विजय चव्हाण, दीपक सोनकांबळे, अँड ज्योती खेसे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी महापौर ढोरे यांनी राज्यभरात राबविलेल्या लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान या रक्तदान शिबिरास मोरया ब्लड सेंटर, स्टार अकादमी फाउंडर मिसेस पिंपरी चिंचवड विशाखा डी एस, मॅट्रिक्स ट्रेड, जीवन फाउंडेशन, ओम साई फाउंडेशन, साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन, शिवनेरी फॅमिली रेस्टॉरंट (सुनीता बोराडे), रामकृष्ण मंगल कार्यालय संचालक हरिश्चंद्र जगताप, किरण जगताप, पिंपळे गुरव मित्र परिवार आदींचे सहकार्य लाभले. पत्रकार संतोष महामुनी आणि महादेव मासाळ यांनी या रक्तदान शिबिराच्या आयोजनात महत्वाचे योगदान दिल्याचे यावेळी दिसून आले.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago