Google Ad
Editor Choice

मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने पूरूषांनी वाजत गाजत सात फेरे मारून केली वटपौर्णिमा साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ जून) :  गूरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि  जाग्रतीच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून वटसावित्री  पौर्णिमा साजरी केली जाते.महाराष्ट्रात पूरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी हि संस्था आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. जेष्ट महीन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी सात प्रदक्षिणा घालून दीर्घ आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाला सूत गूंडाळूण मनोभावे पूजा करतात.

सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणले या कथेचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा करून,”सौभाग्य मागण्याचा हा दिवस”म्हणून साजरा केला जातो .प्रत्येक महिला वटवृक्षाप्रमाणे  आपल्या पतीला दीर्घ  आयुष्य लाभावे व सात जन्मी हाच पती परमेश्वर म्हणून मिळावा म्हणून  दीर्घ आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाची पुजा करण्याची प्रथा आहे.
विकास कुचेकर म्हणाले की महीलांनी वटवृक्षाची फाद्यी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा पुढील पिढीला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळण्यासाठी वटवृक्षाची लागवड करून जतन करण्याचे त्यांनी आव्हान केले.
कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन आभावी आपले प्राण गमवावे लागले ,याचे गांभीर्य ओळखुन वृक्ष लागवड केली पाहिजे, आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी  ऑक्सिजनची सोय असे महिला अध्यक्षा संजना करंजावणे म्हणाल्या.

Google Ad

आण्णा जोगदंड म्हणाले की पत्नी व पती यांना समान कायद्याने आधिकार दिले आहेत.पुरूषप्रधान देशात महिला पण पूरूषांच्या खांद्याला खांदा देऊन खुरपणी पासुन ते नासापर्यत प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत.पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महीला पोचल्या आहेत,तरीही त्या पतीला दिर्घ आयुष्य मिळावे म्हणून 150 वर्षे आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाला सात फेरे प्रदिक्षणा घालतात मनोभावे पुजा करतात .मग पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी आणि पत्नीला दिर्घ आयुष्य मिळावे व सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाची सात फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे ठरू नये.म्हणून आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाची फेऱ्या मारून सुत घालून,सनई,वाद्य वाजवून मनोभावे पूजा केल्याचे समाधान मिळाले असे आयोजक व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.सर्वांना वाजतगाजत मिरवणूक काढून वटवृक्ष पर्यंत आणले.

जोगदंड म्हणाले की आम्ही सर्वाना पर्यावरण संरक्षण आणि सर्वधनाची ,व प्लास्टिक न  वापण्याची शपथ नागरिकांना देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड म्हणाल्या की आमच्यासाठी पुरूषांनी सात फेऱ्या मारुन दिर्घ आयुष्य मागीतले यामुळे खूपच आनंद झाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरुष वटपौर्णिमा साजरी केल्याने आम्ही सर्व महीला आनंदी झालोत.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, पिंपरी चिंचवड महीला अध्यक्षा मिना करंजावणे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, गुणवंत कामगार काळुराम लांडगे,कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर,सुरेश कंक,प्रकाश बंडेवार, राजेंद्र गोराने,आरोग्य निरीक्षण उद्धव ढवरी ,मुकादम विजय कांबळे,लक्ष्मन जोगदंड,भरत शिंदे, प्रदिप बोरसे, अरविंद मांगले, जालिंदर दाते,शंकर नानेकर, दत्तात्रय अवसरकर,वसंत चकटे,विकास कोरे,ही उपस्थित होते

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!