Google Ad
Editor Choice

माजी नगरसेवक सागर आंगोळकर यांच्या वतीने देवेंद्रजी फडणवीस  यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून … दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू वाटप व अंध-अपंग शाळेत अन्नदान!

महाराष्ट्र व14 न्यूज, (दि.२२ जुलै): आज २२ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. लक्ष्मणभाऊ जगताप आणि चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय व पक्षप्रमुखांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवसाच्या जाहिरातीचा अनावश्यक खर्च टाळून माजी नगरसेवक सागर आंगोळकर यांनी हा वाढदिवस अगदी सध्या पद्धतीने दिव्यांग आश्रम तारा सोफेश सेंटर येथे जीवनावश्यक वस्तू वाटप तसेच ममता अंध-अपंग शाळेत सायंकाळी अन्नदान करून साजरा केला.

तसेच भारतीय डाक विभागाची लाभदायी योजना ३९९ रु. मध्ये १० लाख रुपयांचा अपघाती विमा योजना, स्मार्ट कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड नोंदणी आणि शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त पिंपरी चिंचवड म.न.पा. नागरवस्ती विभागातील विविध कल्याणकारी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचा सेवासप्ताह सुरु केला असुन, जनसेवा कार्यालयात आठवडाभर निरंतर या योजनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक सागर आंगोळकरांनी केले आहे.

Google Ad

*पिंपरी चिंचवड म.न.पा नागरवस्ती विभागातील विविध कल्याणकारी योजनेचे फॉर्म*

१. दिव्यांगांना अर्थ सहाय्य
२. विभक्त व घटस्फोटीत महिलांना अनुदान योजना
३. पहिल्या व दुसर्‍या मुलीवर शस्त्रक्रिया ( कुटुंब नियोजन )
४. मुलींना तांत्रिक शिक्षण अर्थसहाय्य
५. मुलींना सायकलीसाठी अर्थसहाय्य ८वी ते 12 वी
६. विशेष मतीमंदाना अर्थसहाय्य
७. दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधन घेणे साठी अर्थसहाय्य
८. इयत्ता १२ वी मध्ये ८० टक्के पेक्ष्या अधिक गुण संपादन बक्षीस योजना
९. इयत्ता १० वी मध्ये ९० टक्के पेक्ष्या अधिक गुण संपादन बक्षीस योजना
१०. इयत्ता १० वी मध्ये ८० ते ९० टक्के पेक्ष्या अधिक गुण संपादन बक्षीस योजना
११. मागास वर्गीय विद्यार्थी ५ ते १० वी शिष्यवृत्ती
१२. मागासवर्गीय मुले मुली ८ वी ते १२ वी सायकल अर्थसहाय्य
१३. मागासवर्गीय मुले मुली १२ वी नंतर उच्च शिक्षण अर्थसहाय्य
१४. १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी अर्थसहाय्य
*स्थळ – _नगरसेवक सागरभाऊ आंगोळकर_ जनसंपर्क कार्यालय, ६० फूटी रोड, देवकर पार्क समोर, पिंपळे गुरव ४११०६१ अधिक महितीसाठी संपर्क ७८८७८८७९९१*

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!