Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवी येथे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डोनेट एड सोसायटीच्या’ माध्यमातून … मुलांनी घेतला शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचा आनंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५सप्टेंबर) : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डोनेट एड सोसायटी’ च्या अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर यांनी सांगवी मधील मुलांसाठी पर्यावरण पूरक दृष्टीकोण जागृत व्हावा यासाठी शाडू माती पासून श्री गणेश बनवण्याची कार्यशाळा घेतली.

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी माननीय महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे , नगर सदस्य श्री संतोष कांबळे, शारदा सोनवणे, बाला शुक्ला, अप्पा ठाकर, वसंत कांबळे, नितीन घोडके, अक्षय धोंडे, संदीप जगताप, मंदार कुलकर्णी, योगेंद्र कातोरे, सागर बोधगीरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

कृष्णा भंडलकर मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळेस श्री सुधीर उदगिरकर सर यांनी शाडू माती पासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक देऊन त्यांच्या सहकाऱ्यां सह मुलांना शाडू माती पासून गणपती बनविणे शिकवले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले .या कार्यक्रमास फक्त सांगवी नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागातून सुद्धा विद्यार्थी आले होते .तीन वर्षापासून ते अगदी सोळा सतरा वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदवला.

अशा पर्यावरण पूरक उपक्रम राबविल्याबद्दल सांगवी मधील सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी अतिशय उत्तम उपक्रम राबवला याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!