महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जून) : 10वी व 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांकरिता महत्वाचे, नुकत्याच 10वी व 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे खुप खुप अभिनंदन, त्यांच्या करीता शिक्षणाच्या पुढील वाटा काय असतील असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडलेला असतो.
10वी, 12 वी नंतर काय असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांना व पालकांना पडलेला असतो, याचेच उत्तर शोधण्यासाठी देवांग कोष्टी समाज पुणे आयोजित करीत आहे . देवांग कोष्टी समाज, पुणे हे नेहमी समाजातील गरजू करीता अनेक विधायक कार्य करत असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे, त्यातून अनेकांनी आपले उज्वल भविष्य घडवले आहे.
देवांग कोष्टी समाज पुणे यांच्या वतीने पिंपळे निलख येथे 10 जून रोजी 10वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता विनामुल्य समुपदेशन/मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे. 10वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता विनामुल्य समुपदेशन/मार्गदर्शन, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रदीप शेट्ये सर असून प्रमुख पाहुणे श्री रत्नाकर धोत्रे सर असणार आहेत.
आपल्या पाल्याची करीअरची निवड करतांना आई बाबांची ईच्छा कींवा खोट्या सामाजिक प्रतिष्ठेला बळी न पडता आपल्या पाल्याची आवड, निवड, त्याचा कल, त्याची क्षमता यांचा विचार करुन व गरज असेल तर तज्ञाचे मार्गदर्शन घेऊन निवड केल्यास योग्य ठरते. केवळ त्याच्या दहावीतील गुणांच्या टक्केवारीवर विश्वास न ठेवता त्याला झेपेल, आवडेल अशाच विषयाची निवड करावी. आपल्या पाल्याचे पुढील शिक्षण योग्य मार्गाने व सुकर व्हावे यासाठी दहावीनंतर काय करावे या विषयी तज्ज्ञ व्यक्ती कडुन विनामूल्य समुपदेशन/मार्गदर्शन केले जाईल. याकरिता सुनील ढगे 9423004828 यांच्याकडे नाव नोंदणी करून याचा विद्यार्थी व पालकांनी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सुरेश तावरे यांनी केले आहे.
ठिकाण – श्री चौन्डेश्वरी मंदिर, देवांग हॉस्टेल, पिंपळे निलख, पुणे
शनिवार दिनांक 10 जुन 2023
वेळ – सकाळी 10:30 वाजता
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…