Google Ad
Uncategorized

देवांग कोष्टी समाज, पुणे यांच्या वतीने पिंपळे निलख येथे 10 जून रोजी 10वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता विनामुल्य समुपदेशन/मार्गदर्शन … येथे, करा नोंदणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जून) : 10वी व 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांकरिता महत्वाचे, नुकत्याच 10वी व 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे खुप खुप अभिनंदन, त्यांच्या करीता शिक्षणाच्या पुढील वाटा काय असतील असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडलेला असतो.

10वी, 12 वी नंतर काय असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांना व पालकांना पडलेला असतो, याचेच उत्तर शोधण्यासाठी देवांग कोष्टी समाज पुणे आयोजित करीत आहे . देवांग कोष्टी समाज, पुणे हे नेहमी समाजातील गरजू करीता अनेक विधायक कार्य करत असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे, त्यातून अनेकांनी आपले उज्वल भविष्य घडवले आहे.

Google Ad

देवांग कोष्टी समाज पुणे यांच्या वतीने पिंपळे निलख येथे 10 जून रोजी 10वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता विनामुल्य समुपदेशन/मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे. 10वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता विनामुल्य समुपदेशन/मार्गदर्शन, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रदीप शेट्ये सर असून प्रमुख पाहुणे श्री रत्नाकर धोत्रे सर असणार आहेत.

आपल्या पाल्याची करीअरची निवड करतांना आई बाबांची ईच्छा कींवा खोट्या सामाजिक प्रतिष्ठेला बळी न पडता आपल्या पाल्याची आवड, निवड, त्याचा कल, त्याची क्षमता यांचा विचार करुन व गरज असेल तर तज्ञाचे मार्गदर्शन घेऊन निवड केल्यास योग्य ठरते. केवळ त्याच्या दहावीतील गुणांच्या टक्केवारीवर विश्वास न ठेवता त्याला झेपेल, आवडेल अशाच विषयाची निवड करावी. आपल्या पाल्याचे पुढील शिक्षण योग्य मार्गाने व सुकर व्हावे यासाठी दहावीनंतर काय करावे या विषयी तज्ज्ञ व्यक्ती कडुन विनामूल्य समुपदेशन/मार्गदर्शन केले जाईल.  याकरिता सुनील ढगे 9423004828 यांच्याकडे नाव नोंदणी करून याचा विद्यार्थी व पालकांनी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सुरेश तावरे यांनी केले आहे.

ठिकाण – श्री चौन्डेश्वरी मंदिर, देवांग हॉस्टेल, पिंपळे निलख, पुणे
शनिवार दिनांक 10 जुन 2023
वेळ – सकाळी 10:30 वाजता

 

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!