Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथे बुद्ध भुषण सेवा संघाच्या वतीने आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दिर्घ आयुष्यासाठी सुत्त पठण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : बुद्ध भुषण सेवा संघाच्या वतीने चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी व दिर्घ आयुष्यासाठी सुत्त पठण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते मा. शशिकांत दुधारे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी मा. पुणाजी रोकडे मा. एम. एल. कांबळे मा. गोरख साळुंखे मा. आण्णाराव गायकवाड मा. सुभेदार साबळे मा. सुभाष कांबळे मा. मधुकर सोनवणे व बुद्ध भुषण सेवा संघाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

यावेळी बोलताना शशिकांत दुधारे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा होत आहे. आमदार जगताप यांचे आपल्या विहारावर विशेष प्रेम आहे. म्हणूनच मागील दहा वर्षांपासून बाबासाहेबांची जयंती असो, बुद्ध पौर्णिमा असो किंवा विहारातील कोणताही लहान मोठा समारंभ असो ते स्वतः जातीने हजर रहात असत.

आमच्यासारख्या हजारो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे आमचे भाऊ हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक योद्धा असून त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा व ते पुन्हा एकदा जनसेवेसाठी सज्ज व्हावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!