महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ ऑक्टोबर) : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इयत्ता दहावी व बारावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये विजेत्यांचा बक्षीस समारंभ हा कार्यक्रम रविवार दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता काशीधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री निखिलजी लातूरकर होते तसेच प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री शंकर भाऊ जगताप यांनी भूषविले त्याचप्रमाणे इतर सन्माननीय नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे शैलजाताई मोरे व नगरसेवक सुरेश भोईर त्याचप्रमाणे महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन प्रदेश सरचिटणीस दिलीप जी कुलकर्णी ब्रम्होद्योग उपाध्यक्ष राजन बुडूख पवन वैद्य शंकर कुलकर्णी दिलीप जोशी व महासंघाचे शहराचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी व कार्याध्यक्ष महेश बारसावडे तसेच पुणे जिल्हा महिला अध्यक्ष केतकी ताई कुलकर्णी व्यासपीठावर होते.
यावेळी माननीय शंकर भाऊ जगताप यांनी सांगितले की लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप फाउंडेशन च्या वतीने पाच विद्यार्थ्यांचा वार्षिक शिक्षणाचा खर्च करण्यात करण्यात येतो अशी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना देव देश आणि धर्म यांची सेवा करण्याचे आवाहन केले.
.निखिल जी लातूरकर यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये जास्त वेळ न घालविता आपल्या ध्येयाकडे जास्त लक्ष द्या म्हणजे आपले भविष्य उज्वल होईल. तसेच त्यांनी बीजेपी चे अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण महासंघाला पाच जागा देण्यात याव्या अशी विनंती केली. 450 पालक व नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
115 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आणि कै सौ अमिता कुलकर्णी कै श्रीहरी वाळवेकर व कै सौ शरयु जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनुक्रमे श्री उमेश कुलकर्णी सौ वैशाली कुलकर्णी व श्री नितीन जोशी यांनी प्र्यत्येकी 5000 प्रमाणे मुलांना शिष्यवृत्ती दिली त्याचप्रमाणे गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सौ स्वाती संदीप पवार (वडमुख वाडी आळंदी) द्वितीय क्रमांक सौ अनिता कुलकर्णी(राहटणी पुणे), तृतीय क्रमांक सौ मंजुषा शिंदे (तानाजी नगर चिंचवड) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून पी व्ही इव्हेंटचे कु पूर्वा बारसावडे यांनी केले.
गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या कार्यक्रमाला विशेष मदत सौ सुषमा वैद्य व सौ संध्याताई कुलकर्णी यांनी केली.
सर्व उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष श्री सचिन कुलकर्णी व कार्याध्यक्ष श्री महेश बारसावडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अतुल इनामदार यांनी केले. सूत्रसंचालन सौ पूजा कुलकर्णी यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री आनंद देशमुख सौ संध्या कुलकर्णी श्री शामकांत कुलकर्णी श्री राहुल कुलकर्णी श्री मकरंद कुलकर्णी श्री भाऊ कुलकर्णी, श्री प्रवीण कुरबेट श्री पंकज कुलकर्णी सौ सुषमा वैद्य व श्री कार्तिक गोवर्धन आणि महासंघाचे इतर सर्व माननीय पदाधिकारी यांनी केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…