Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदपथ व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे अथवा अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर व अतिक्रमणावर होणार कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मार्च २०२२) :  पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदपथ व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे अथवा अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर व अतिक्रमणावर महाराष्ट्र महानगरपालिका अतिक्रमण पथक व धडक पथकाने कारवाई करावी, असे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.
याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे.

आदेशात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील पदपथ व सायकल ट्रॅक नागरिकांना वापर करणेकरीता उपलब्ध करून देणेबाबत महानगरपालिकेची जबाबदारी आहे. तथापि शहरातील बहुतांश पदपथ व सायकल ट्रॅकवर नागरिक अनाधिकृतपणे/अतिक्रमण करून वाहने पार्क करीत असल्याने नागरिकांना पदपथावर चालतांना व सायकल ट्रॅकवर सायकल चालवतांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पदपथावर व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे/अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणे व अतिक्रमण निष्काशीत करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक रस्त्यांच्या किंवा विशिष्ट सार्वजनिक रस्त्यांच्या बाबतीत अशा रस्त्याच्या बाजूस किंवा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना धोका पोहोचण्याचा किंवा अडथळा होण्याचा संभव आहे असे वाटेल अशा सर्व वाहनांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २०८ ती वाहने ओढून नेण्याची किंवा त्यांचे स्थलांतर करणेस आणि कलम २४३-अ (१) नुसार अशी वाहने महापालिका आयुक्तास योग्य वाटतील अशा जागी उभी करून ठेवता येतील. त्यासंबधातील फी किंवा शुल्क आकारण्यास आयुक्तास अधिकार प्राप्त आहेत. तसेच महापालिका अधिनियम कलम ३९२ (१) अन्वये वरील कलम २४३-अ (१) व कलम २०८ मधील तरतुदींचे उल्लंघन करील किंवा अनुपालन करण्यात कसूर करील त्यास अशा प्रत्येक अपराधाबद्दल दंडाची शिक्षा करण्यास महापालिका आयुक्त सक्षम आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रस्त्यावरील सर्व प्रकारच्या पादचारी मार्गावर/पदपथावर अतिक्रमण करणे, वाहने लावणे व तत्सम गोष्टी करणाऱ्या किंवा वाहनांवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेच्या सर्व रस्त्यावरील पदपथ/पादचारी मार्गावर पादचाऱ्यांना अडथळा होणाऱ्या सर्व प्रकारचे अतिक्रमण वाहने इ. वर कारवाई करून जप्त करणे व त्यावर दंडात्मक रक्कम वसुली करणेबाबतचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षकांनी क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील धडक पथकामार्फत कारवाई करुन आपल्या अधिनस्त क्षेत्रातील सर्व पदपथ/पादचारी मार्ग लोकांना चालण्यास सुरक्षित व सुस्थितीत रिकामे राहतील याची दक्षता घ्यावी आणि ज्या ठिकाणी पदपथावर वाहने पार्क केली असतील किंवा अतिक्रमण असेल त्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयाकडे सह शहर अभियंता (अतिक्रमण) यांचेमार्फत द्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे

 

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

6 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

13 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago