Google Ad
Uncategorized

६ ऑगस्ट रोजी नवी सांगवी येथे … ‘ राष्ट्रीय विणकरदिन’ आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजबांधवांचा सन्मान सोहळा’

६ ऑगस्ट रोजी नवी सांगवी येथे मोठ्या स्वरूपात ‘ राष्ट्रीय विणकरदिन’ आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजबांधवांचा सन्मान सोहळा’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ ऑगस्ट २०२३) : दि. ६ ऑगस्ट २०२३, रवि.रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ ह्या वेळेत पुणे येथील नवी सांगवी व पिंपळे सौदागर परिसरातील निळू फुले नाट्यगृहात राज्यस्तरीय ‘ राष्ट्रीय विणकरदिन आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या राज्यभरातील समाजबांधवांचा सन्मान सोहळा ‘ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समिती आणि देवांग कोष्टी समाज ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ना.छगनराव भुजबळ (मंत्री,अन्न व नागरी पुरवठा, महाराष्ट्र राज्य) आणि ना.चंद्रकांतदादा पाटील (मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य; पालकमंत्री, पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.तसेच खा.श्रीरंग बारणे, आ.श्रीमती अश्विनीताई जगताप,आ.अनिल बाबर,आ.सौ.देवयानी फरांदे,आ.प्रकाश आवाडे,शंकरभाऊ जगताप (अध्यक्ष, भा.ज.प., पिंपरी चिंचवड), आ.कैलास गोरंट्याल,आ.महेश चौगुले, ओमप्रकाश दिवटे (आयुक्त, म.न.पा., इचलकरंजी), हिरालाल पगडाल (एस.बी.सी.मार्गदर्शक) ह्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Google Ad

तरी ह्या राज्यस्तरीय सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली सामाजिक बांधीलकी व्यक्त करावी, असे आवाहन महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीचे संयोजक, तसेच देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष सुरेश तावरे ह्यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!