Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

२२ मे रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या केंद्रावर ‘ … कोविशिल्ड ‘ व ‘ कोव्हॅक्सिन ‘ लस फक्त वय वर्षे ४५ पुढील नागरिकांना देण्यात येणार!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .२१ / ०५ / २०२१) :  शासनाने दिलेल्या लेखी मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि .२२ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . तसेच उद्या दि .२२ / ०५ / २०२१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील केंद्रावर ‘ कोविशिल्ड ‘ व ‘ कोव्हॅक्सिन ‘ लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांना देण्यात येणार आहे .

ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . तसेच ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे .

Google Ad

त्या अनुषंगाने उद्या दि .२२ / ०५ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ पहिला व दुसरा तसेच ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच वरील लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

64 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!