महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ जुलै) : पिंपळे गुरव येथील 8 टू 80 गार्डन सुदर्शन चौक येथे रस्त्यावर वाहनातून आॅईल गळती झाली होती. ही ऑईल गळती या गार्डन समोर असणाऱ्या राडत्यावरच झाल्याने, तसेच हा मुख्य चौक असल्याने या ठिकाणी वाहनांची सारखी ये-जा चालू असते. त्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता होती.
यासंदर्भात स्थानिकांनी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर यांच्याकडे याबाबत तक्रार केली. तानाजी जवळकर यांनी ताबडतोब अग्निशामक दलाच्या अधिकारयांना फोन करुन ऑईल गळती झाल्याने वाहने वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने सदर रस्ता धुऊन देण्याची मागणी केली.

पिंपरी चिंचवड मनपाच्या अग्निशामक दलाच्या अधिकारयांनी या गोष्टीची दखल घेत गाडी पाठवुन हा रस्ता स्वच्छ धुऊन साफ केला. त्यामुळे याठिकाणी होणारा संभाव्य धोका टळला. याकरिता फायरमन कैलास वाघेरे, विष्णू बुदवंत,ओंकार रसाळ,अनिकेत घुले,वाहनचालक संजय चव्हाण यांनी ही कार्यवाही केली. यावेळी या भागातील अतुल पवार,विनोद रत्नम,सचिन भांबुरे,दत्ता कदम,धर्मा चोथवे, संतोष गोडसे मामा,साहिल रोकडे,आकाश कळसकर, किरण शेळके,आदिनाथ चौकटे ह्यांनी देखील सहकार्य केले.