Categories: Uncategorized

देशाच्या चांद्रयान 3 मोहिमेत योगदान देत गरुड झेप घेणाऱ्या प्राईड इंग्लिश स्कूलच्या ‘आदेश फलफले’ चा … ‘अप्पा रेणुसे’ मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जुलै) : “आकांक्षापुढती गगन ठेंगणे! म्हणतात तसे पुण्यातील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये शिकताना लहान वयात पाहिलेली स्वप्ने आपल्याला कितीतरी उंच घेऊन जाऊ शकतात, देशासाठी काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देत असतात, असेच स्वप्न प्राईड इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थी आदेश फलफले यांनी पाहिले अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याचे आदेशने स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात आणले, व या तरुणाने देशाच्या चांद्रयान 3 मोहिमेत योगदान दिले ही एक गरुड झेपच.

यशस्वी अवकाशमोहिमेनंतर आकाश श्रीहरीकोट्ट्याहून पुण्यात छोट्याश्या सुटीवर आल्यानंतर आवर्जून वडिलांसह तो अप्पा रेणूसे यांना भेटायला आला आणि मग रंगली गप्पांची सुरेख मैफल देखील रंगली.

यावेळी बोलताना अप्पा रेणूसे म्हणाले की, “अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आपला देश किती वेगाने प्रगती करतो आहे याची नवनवीन माहिती अवघ्या २३ वर्षाच्या या संशोधक तरुणाकडून ऐकताना तर अक्षरशः थक्क व्हायला होत होते.”

अत्यंत उत्साहाने सळसळणारा आदेश . इस्रोसारख्या प्रमुख संशोधनसंस्थेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या अवकाश मोहिमांमध्ये योगदान देतो आहे. या तरुणाचे विचार अतिशय प्रेरक आहेत. आपल्या देशाविषयीचा अभिमान आदेशच्या शब्दाशब्दांतून जाणवत होता.

चांद्रयान मोहिमेचे महत्त्व, त्याचे वेगळेपण या विषयी आदेशने माहिती दिलीच पण आता या पुढील काळात थेट सूर्याची माहिती घेण्यासाठी ‘आदित्य’ ही अवकाश मोहिम नियोजित केलेली आहे. त्याचीही माहिती आदेशने दिली.स्पेसक्राफ्ट थर्मल इंजिनिअर म्हणून इस्रोच्या अवकाश मोहिमांमध्ये योगदान देणारा हा तरुण म्हणजे आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे.

एकीकडे अवघड अशा विषयात संशोधन करणारा हा तरुण सुरांची उत्तम जाण असणारा आहे, हे आणखी एक विशेष.  गप्पांची छान मैफल रंगलेली असताना त्याचा हा एक नवा पैलूही समजला. त्याने ‘सूर निरागस हो..’ या गीताने सगळ्यांचीच मने जिंकली.

आदेशच्या भविष्यातील वाटचालीला अप्पा रेणुसे तसेच सर्वांनीच भरभरून शुभेच्छा दिल्या आणि तो देखील नवी ऊर्जा भरून घेत नव्या संशोधनासाठी रवाना झाला…

आदेशा या कौतुक प्रसंगी त्याचे वडील संजय फलफले, अप्पा रेणुसे, विलासराव भणगे,पराग पोतदार , शंकरराव कडू, विराज रेणुसे, नेमीचंद सोळंकी, मयूर संचेती, अभिराज रेणुसे, आदित्य कडू ,यश पवार व इतर मित्र परिवार उपस्थित होता.

Maharashtra14 News

Recent Posts

महाराष्ट्राचा 58 व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ …. पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 :  महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…

7 hours ago

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

4 days ago

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…

1 week ago

अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! महसूल फडणवीसांकडे, अर्थ खाते अजितदादांकडे, तर ….

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…

1 week ago

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज … हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारची लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…

1 week ago

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…

1 week ago