Google Ad
Editor Choice

कार्यकर्ते म्हणतात आता करेक्ट कार्यक्रम होणार … पुण्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला थोपवण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस पालकमंत्री म्हणून मैदानात ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) : भाजपच्या मदतीने राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. आता नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री म्हणून पुणेकरांसमोर येवू शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पुणे शहर आणि जिल्हा ओळखला जातो. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरणार आहेत. देवेंद्र फडणवीस सध्या पुणे- पिंपरी- चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, जिह्यातील सहकारी साखर कारखाने आदींच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून आहेत. येत्या काळात ते पुण्याच्या पालकमंत्रीपदाची देखील हाती घेऊ शकतात, असही शक्यता आहे. दरम्यान, नुकतेच शिंदे सरकारने पुणे जिल्ह्याच्या ८७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला स्थगिती दिली आहे. तो याच रणनीतीचा भाग असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

Google Ad

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सद्दी संपविण्यासाठी आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, जिह्यातील सहकारी साखर कारखाने, बारामतीसह सर्वच नगर परिषदा आणि सहकारातील सर्व निवडणुकांमध्ये तगडे आव्हान देण्याचा फडणवीसांचा प्रयत्न राहणार आहे. तसेच, शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटिशीविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर २० तारखेला निकाल अपेक्षित आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ उद्या (ता. २० जुलै) निर्णायक सुनावणी करणार आहे. या निकालाचा सरकारला दिलासा मिळताच मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्याच दरम्यान पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय होणार असल्याचेही या आमदारांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!