Google Ad
Editor Choice

गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना इशारा; म्हणाले “त्यांचेही कारणामे लवकरच जगासमोर.”

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ नोव्हेंबर) : जळगाव शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे यांनी नाव न घेता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर केला.

खडसेंच्या या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ गुलाबराव पाटील म्हणाले, की आजपर्यंत खडसेंनी काहीच केलं नाही, म्हणून मी शहरासाठी काहीतरी करतोय हे खडसेंना दाखवायचं आहे. खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून त्यांनी शहरासाठी किती पैसे दिले? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Google Ad

तर गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंना भरपूर वेळ असल्याने ते इकडे तिकडे फिरत राहतात. मात्र त्यांचेही कारणामे लवकरच समोर येतील, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिला आहे. दरम्यान रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पुन्हा एकदा खडसे-पाटील आणि महाजन यांच्यात ठिणगी पडली आहे. एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा – नुकतंच जळगावच्या राजकारणाविषयी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. जळगाव जिल्ह्यातील संस्था विरोधकांनी म्हणजेच भाजपने डबघाईला आणायच्या आणि नाथाभाऊनी त्या नीटनेटक्या करायच्या. हे आतापर्यंतचं उदाहरण असल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!