Google Ad
Editor Choice

आता बारामती देशात घडवेल, दुसरी कृषी क्रांती…! बारामतीतील अटल इनक्युबेशन सेंटरचे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन…!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ नोव्हेंबर) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळात या देशाने कृषी क्रांती अन्नधान्याच्या बाबतीत हा देश केवळ स्वयंपूर्ण नव्हे तर निर्यातीच्या बाबतीत अगदी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकापर्यंत आता या देशातील शेतकरी व शेतीपूरक उद्योगांना संशोधन व तंत्रज्ञानाची जोड देतानाच कृषी क्षेत्राशी निगडित उद्योजक व संशोधक घडवण्याचा नवा संकल्प बारामतीतील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट पूर्णत्वाला येणार आहे त्याची सुरुवात मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे.

येथील अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयात च्या आवारात उभारलेल्या अटल इनक्युबेशन सेंटरच्या सुसज्ज व अत्याधुनिक इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 2) होणार आहे.

Google Ad

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रताप पवार, बाबा कल्याणी, अतुल किर्लोस्कर, विजय शिर्के, दीपक छाब्रिया, सुधीर मेहता, विठ्ठल मणियार, रणजित पवार, आर वेंकट रमणन, राजू बारवाले, उषा झेअर, जगन्नाथ शिंदे, रमेश थोरात, मायकेल इरकेल, अनुराग प्रताप, मॅथ्यू जोसेफ, संतोष भोसले, आशुतोष चढ्ढा हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी ही माहिती दिली.

निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत २०१७-१८ या वर्षात संपूर्ण भारतातून अटल इनक्युबेशन सेंटर्सची उभारणी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. देशभरातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते. या अर्जामधून निती आयोगाने देशातील सर्वोत्कृष्ट २०० संस्थांना नवी दिल्ली येथे सादरीकरणासाठी बोलाविले.

या निवडक २०० संस्थामधून ७२ अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारण्यासाठी मंजुरी दिली गेली. निती आयोगाच्या निवड समितीसमोर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नीलेश नलावडे यांनी नवी दिल्ली येथे ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादरीकरण केले होते. कृषी क्षेत्रात इनक्युबेशन सेंटर्स उभारणीसाठी देशातील दोनच संस्थांना परवानगी मिळाली आणि त्यापैकी एक म्हणजे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती!
नीती आयोगाच्या ऑफलाईन व ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये या टीमच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला असून देशातील पहिल्या पाच अग्रगण्य इनक्युबेशन सेंटरमध्ये एआयसी एडीटी बारामती फाउन्डेशनचा समावेश केला गेला आहे.

अशी असेल संकल्पना…
विद्यार्थी, प्राध्यापक, आणि संशोधकांमध्ये उद्योजकता संस्कृती वाढविणे, विशिष्ट क्षेत्रे आणि डिझाइन उत्पादनांमधील विकास प्रक्रियांचा आरंभ करणे, आर्थिक तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर या इन्क्युबेशन सेंटरचा भर असून उद्योग-व्यवसायाच्या नवीन संकल्पना असलेल्या सर्व वयोगटातील संभाव्य उद्योजकांना घडवण्याचे काम हे इनक्युबेशन सेंटर करीत आहे.
औपचारिक शिक्षण व्यवस्थेसोबतच संशोधन, उपयोजन, उद्योजकता आणि उद्यमशीलता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न या सेंटरकडून केले जात आहेत. या केंद्रात इन्क्युबेशन प्रोग्रॅमसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी जागा, लॅब, इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था, मार्गदर्शन व उद्योग स्थापणे साठी बीज भांडवल अशा सुविधा अटल इंक्युबेशन सेंटर कडून पुरवण्यात येतात.

नावीन्यपूर्ण संकल्पनांवर काम करणाऱ्या संशोधक व नवउद्योजकांना प्रोडक्ट चे टेस्टिंग, ट्रायल आणि सर्टीफिकेशन, बीज भांडवल, अनुदान मिळवून देणे, व्यावसायिक व तांत्रिक तज्ज्ञांशी जोडणे आणि व्यवसायाला पूरक वातावरण व संधी निर्माण करण्यासाठी सेंटरमार्फत मार्गदर्शन केले जाते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!