Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मध्ये आता विनापरवाना वृक्षतोड केल्यास द्यावा लागणार ५० हजार रुपयांचा दंड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११जुलै) : विनापरवाना वृक्षतोड केल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये आता 50 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. शहरात होणाऱ्या अमाप वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

विनापरवाना वृक्षतोडीचे छायाचित्र, व्हिडीओसह माहिती देणाऱ्यालाही बक्षीस दिले जाणार आहे. यापूर्वी विनापरवाना वृक्ष तोडल्यास केवळ 10 हजार रुपये दंड आकारला जात होता. मात्र, आता दंडाची रक्कम थेट 50 हजार झाल्याने बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!