महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ मार्च) : एखाद्या राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये किमान 6 टक्के मते मिळाल्यास तो “राष्ट्रीय पक्ष” म्हणून ओळखला जातो. याशिवाय त्या पक्षाला लोकसभेच्या किमान चार जागा जिंकाणे आवश्यक असते.
निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय पक्षा’च्या दर्जाबाबतचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज आयोग आज सुनावणी घेणार आहे. निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची अट पूर्ण करत नाही. यााबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे.
राष्ट्रवादीच्या हातातून घड्याळ जाणार 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीप्रमाणेच सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्व समिक्षेखाली आलं होतं. पण राज्यांमधल्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. 1968 सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीने केलेल्या अपीलवर निवडणूक आयोगाचं समाधान झालं नाही, तर राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…