Categories: Editor Choiceindia

Delhi : Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही … नवीन मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना संकटामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परंतु या दरम्यान ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र (RC) संबंधित काही कामं करायची असतील, तर आपणास कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण नव्या शासन नियमानुसार, आता वाहनचालकांना आरटीओत जाण्याची गरज भासणार नाही. सर्व आवश्यक प्रक्रिया ऑनलाईन केल्या जाणार आहेत. या अंतर्गत आपण नोंदणी प्रमाणपत्र (RC) 60 दिवस अगोदर नूतनीकरण करू शकता.

▶️रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करणे आणि नूतनीकरण करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली. त्याअंतर्गत कोरोना काळात अशा कामांसाठी लोकांना आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही. बहुतेक काम डिजिटल पद्धतीने केले जातील.

▶️आरटीओमध्ये परीक्षा देण्यासाठी जाण्याची गरज नाही

आपणास लर्निंग लायसन्स मिळवायचे असेल तर आपणास परीक्षेच्या प्रक्रियेतून जावे लागते. परंतु कोरोना काळात परिवहन मंत्रालयाने यातून दिलासा दिला असून, आरटीओमध्ये जाऊन चाचणी देण्याची अत्यावश्यकता दूर केली आहे. आता अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ट्युटोरियलद्वारे घरी बसूनच त्यांना यासाठी मदत मिळू शकेल.

▶️कालबाह्य कागदपत्रे 30 जूनपर्यंत वैध मानली जाणार

ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC), फिटनेस प्रमाणपत्र, परमिट इत्यादी सारखी मोटार वाहन कागदपत्रे ज्या वाहनचालकांची 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य झाली, त्यांना नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिलासा मिळाला आहे. सरकारने त्यांची वैधता मर्यादा 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत कालबाह्य कागदपत्रे जूनपर्यंत वैध मानली जातील. वाहन चालकांना कोणतेही चालान भरावे लागणार नाहीत.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

5 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

12 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

2 days ago