Categories: Editor Choice

महाराष्ट्राला नितीन गडकरींचे मोठे गिफ्ट … 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामांना मंजूरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मार्च) : रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रातील 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामाला मंजूर दिली आहे.

या संदर्भात गडकरी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. या रस्त्यांमध्ये परभणी, नांदेड, गडचिरोली आणि बारामतीच्या महामार्गाचा समावेश आहे.

कोणत्या रस्त्यांसाठी किती कोटींची मंजूरी?

गडकरी यांनी एका मागे एक असे ट्वीट करत महाराष्ट्रातील कोणत्या रस्त्यांसाठी किती कोटींची मंजूरी देण्यात आली आहे, या संदर्भात माहिती दिली आहे. यातच महाराष्ट्रातील एनएच-160 च्या उंडेवाडी कडेपठार ते देशमुख चौक व धवन पाटील चौक (बारामती) ते फलटण या 33.65 किमी रस्त्याचे 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 778.18 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. ढवळी ते गडचिरोली रस्त्याच्या एनएच-930 वरील ढवळी ते राजोली, पांधसाळा ते मोहडोंगरी, आंबेशिवणी फाटा ते बोदली आणि मेड तुकुम ते गडचिरोली या 28 किमी लांबीच्या सध्याच्या महामार्गाचे 2L+PS/4 लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 316.44 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. एनएच-752 एच च्या चिखली – दाभाडी – तळेगांव – पाल फाटा या 37.260 किमी रस्त्याचे 2-लेन, तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 350.75 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे.

तसेच एनएच-543 भाम्हापुरी – वडसा – कुरखेचा – कोरची – देवरी – आमगांव रस्ता व लेंधारी पुल या छोट्या पुलाच्या बांधणीला EPC मोडवर 163.86 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे. कुरखेडा शहरातील सध्याच्या महामार्गाचे 4-लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करणे, शंकरपूर – गुरनुली विभागात 2-लेन रस्ता व भुती नाला आणि सती नदीवर मोठे पूल. याशिवाय महाराष्ट्रातील एनएच-753एच वरील भोकरदन ते कुंभारी फाटा आणि राजूर ते जालना विभाग, या 26.07 किमी रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 291.07 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. याशिवाय एनएच-161A च्या मुदखेड ते नांदेड विभागातील नांदेड – भोकर – हिमायतनगर – किनवट तसेच माहूर – अरणी रोड या रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 206.54 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे.

अशोक चव्हाण यांनी मानले गडकरींचे आभार

नांदेड जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी 206.54 कोटी रुपयांची मंजूरी दिल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. अशोक चव्हाण ट्वीट करत म्हणाले आहेत की, ”नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेतल्याबद्दल मी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा आभारी आहे.”

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

9 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

16 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago