Google Ad
Uncategorized

पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या – निलेश हाके यांची पिंपरी चिंचवड आयुक्तांना निवेदनातून मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ ऑगस्ट) : महाराष्ट्र शासकीय आदेशानुसार आसाम यूनिवर्सिटी ही पदोन्नतीसाठी ग्राह्य आहे, त्यामुळे पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या असे निवेदन निलेश हाके यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना दिले आहे.

या निवेदनात हाके यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र शासकीय आदेशानुसार आसाम यूनिवर्सिटी ही पदोन्नतीसाठी ग्राह्य आहे तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुठल्याही प्रकारचे अद्याप पदोन्नती झालेली नाही”.

Google Ad

तसेच UGC ने जाहीर केलेल्या १९९४ ते २०२२ च्या जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये कुठेही आसाम यूनिवर्सिटी चा समावेश नाही, तरी आपल्या या निर्णयामुळे अनेक पदोन्नतीसाठी पात्र असलेले अधिकारी वंचित आहेत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निलेश हाके यांनी केला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर प्रकरणी आपण सहानुभूतीपूर्वक विचार करत असाम यूनिवर्सिटीतून पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना त्वरित पदोन्नती द्यावी ही नम्र विनंती अन्यथा त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर न्यायालयीन लढाई सुरू केली जाईल. याबाबत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना निवेदन देण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!