Google Ad
Editor Choice

फुगेवाडी येथील निलेश हाके ठरले अपघात ग्रस्त युवतीसाठी देवदूत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३मे) : निगडी येथून बहीण राहत असलेल्या ठिकाणाहून रात्री नऊच्या सुमारास दुचाकी वरून पुण्याच्या दिशेने घरी जात असताना कासारवाडी येथील कुंदननगर चौकात मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहन असलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील महिला युवतीचा गंभीर अपघात घडून आला. युवतीच्या डोक्याला मार लागल्याने रक्ताचा थारोळ्यात ती पडली होती. यावेळी कार चालक न थांबताच निघून गेला होता.

रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास कासारवाडी येथील कुंदन नगर चौकात मुख्य रस्त्यावर एका कारने श्रुती कानडे (वय २३), रा. नारायण पेठ पुणे. या दुचाकीवरून निगडी येथून पुण्याच्या दिशेने घरी जात असताना एका कारने धडक दिली. यावेळी गंभीर अपघात घडून आला. श्रुती कानडे मुख्य रस्त्यावर डोक्याला मार लागून रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. परिसरातील नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत होते. मात्र तिच्या मदतीला रात्रीच्या सुमारास कोणीही धावून येत नव्हते.

Google Ad

यावेळी येथील रस्त्यावरून शिवसेनेचे युवानेते निलेश हाके जात असताना गर्दी पाहून थांबले. अपघात ग्रस्त युवती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून क्षणाचाही विलंब न लावता देवदूत बनून या युवतीला मदतीचा हात देत दापोडी येथील एका खाजगी रुग्णालयात तातडीने नेऊन प्रथोमोपचारासाठी दाखल केले. त्वरित प्रथमोपचार मिळाल्याने त्या युवतीचे प्राण वाचले. यावेळी युवतीच्या घरी संपर्क करून तिच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली असता काही वेळातच तिचे नातेवाईक रुग्णालयात पोहचले. यावेळी रुग्णालयात वेळीच प्रथमोपचार मिळाल्याने देवदूत बनून जीव वाचविणाऱ्या शिवसेनेचे युवानेते निलेश हाके यांचे अपघात ग्रस्त युवतीने व नातेवाईकांनी आभार मानले.
———————————————-
माणूस म्हणून आणि सामाजिक कर्तव्य बजावत अपघात ग्रस्त युवतीचे प्राण वाचविण्यात यश मिळाले. याचा मला आनंद होत आहे.
निलेश हाके, शिवसेना युवानेते फुगेवाडी
———————————————-
मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना कोणीही मदतीसाठी धावून आले नाही. मात्र एक माणूस देवदूत बनून माझ्या मदतीला धावून येत माझे प्राण वाचविले. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
श्रुती कानडे, पुणे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!