Categories: Editor Choice

निगडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी … मोबाईल फोन चोरी करणारे अट्टल गुन्हेगारास अटक करुन एकुण ३१ मोबाईल हस्तगत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ जुलै) : निगडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी मोबाईल फोन चोरी करणारे अट्टल गुन्हेगारास अटक करुन त्याचेकडुन ३,२०,००० / – रु . चे एकुण ३१ मोबाईल हस्तगत दिनांक २०/०७/२०२२ रोजी निगडी तपास पथकातील पो.ना. / १५८० बी.के. चौधरी यांना मिळालेले गोपणीय बातमीवरुन निगडी पोलीस ठाणे गु.र.नं. १०० / २०२२ भा.द.वि.सं.कलम ३८० , ४११ , ३४ मधील पाहीजे आरोपी दत्ता संतोष धोत्रे वय २० वर्षे रा . गणेश हौसींग सोसायटी , बि.नं. सी -३ , रुम नं . ४१५ , ओटास्कीम , निगडी , पुणे हा ट्रान्सपोर्टनगर भागामध्ये मोबाईल फोन विक्री करण्यासाठी आला असताना पो.ना. / १५८० चौधरी व पोहवा / ९ ७१ शिंदे , पोना / १५ ९ ३ दिवटे त्याला पकडण्यासाठी जात असताना आरोपी पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडले .

त्यास पोलीस ठाणेस आणुन तपास करता त्याचेजवळ चोरी केलेले ४ मोबाईल फोन मिळुन आले . तसेच त्याने निगडी , महाळुंगे , तळवडे तसेच पिंपरी चिंचवड पुणे परीसरात रात्रीचे वेळी वेगवेगळ्या घरातुन मोबाईल फोन चोरी केले असुन सदरचे मोबाईल फोन त्यांचे तोंडओळखीचा हर्षीत सिंग यांस विकले असल्याचे सांगीतलेने आरोपी हर्षीत सिंह यांचा महाळुंगे परीसरात शोध घेत असताना तो महिंद्रा कंपनीजवळील एच . पी . पेट्रोल पंपाजवळ मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले असुन आरोपी हर्षीत शामनारायण सिंह वय २२ वर्षे रा . जामदार वस्ती , महाळुंगे ता . खेड जि . पुणे मुळगांव सिध्दीकला तहसिल रावसंगज जि . सोनभद्र ( उत्तरप्रदेश ) यांस पोलीस ठाणेस आणुन तपास करता त्यांचेकडे चोरीचे २ मोबाईल फोन मिळुन आले असुन ते पंचनाम्याने जप्त करण्यात आले आहेत .

आरोपी दत्ता संतोष धोत्रे वय २० वर्षे रा . गणेश हौसींग सोसायटी , बि.नं. सी -३ , रुम नं . ४१५ ओटास्कीम , निगडी , पुणे यांस विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने पिंपरी चिंचवड पुणे पिंपरी परीसरातुन चोरी केलेले मोबाईल फोन लपवुन ठेवलेले १५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत . तसेच आरोपी हर्षीत सिंग यांचेकडे तपास करता तो आरोपी दत्ता धोत्रे यांचेकडुन चोरीचे मोबाईल घेऊन तो त्याचे गांवी उत्तरप्रदेश येथे पाठवित असल्याचे सांगुन दत्ता धोत्रे यांने त्यास विकलेले १० मोबाईल फोन त्यांचेकडून हस्तगत करून पंचनाम्याने जप्त करण्यात आले आहेत . दोन्ही आरोपींना मा . न्यायालयात हजर केले असता त्यांची दिनांक २४/०७/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर असुन गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा . / ९ ४ ९ आवताडे हे करीत आहेत .

आरोपींकडुन जप्त करण्यात आलेले मोबाईलची माहिती खालीलप्रमाणे :-

 

वरील प्रमाणे एकुण ३१ मोबाईल फोन किं . रु . ३,२०,००० / -रु . किंमतीचे चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असुन त्याचेकडुन महाळुंगे पोलीस ठाणेकडील १ रात्रौ घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . तसेच इतर मोबाईल फोनचे आय . एम . ई . आय.नं. वरून तपास सुरू आहे . तरी सदर यादीमधील वरील वर्णनाचे कोणाचे मोबाईल फोन घरातुन चोरी झालेले असल्यास निगडी पोलीस ठाणेशी संपर्क साधणेस विनंती आहे . सदरची कामगिरी मा . श्री . अंकुश शिंदे पोलीस आयुक्त साो . पिंपरी चिंचवड . मा . डॉ . श्री . संजय शिंदे , अप्पर पोलीस आयुक्त साो . पिंपरी चिंचवड , मा . श्री . मंचक इप्पर साो . पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ- १ , पिंपरी चिंचवड ,

  • मा.डॉ.श्री . सागर कवडे साो . सहायक पोलीस आयुक्त , पिंपरी विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री . रंगनाथ उंडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . विश्वजीत खुळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , श्री . अमोल कोरडे , सहा.पोलीस निरीक्षक , निगडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस हवालदार सुधाकर अवताडे , सतिश ढोले , दत्तात्रय शिंदे , विलास केकाण , पोलीस नाईक शंकर बांगर , विनोद व्होनमाने , सोमनाथ दिवटे , रुपेश गेंगजे , विजय बोडके , भुपेंद्र चौधरी , राहुल गायकवाड , राहुल मिसाळ यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी केली आहे .
Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

20 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago