Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मधील निगडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण … पण, उद्घाटनावर पुन्हा श्रेयवादाचे सावट!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जून ) : पिंपरी चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार असणाऱ्या निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल तसेच वर्तुळाकार रस्ता असा सुमारे ९० कोटी खर्चाचा एकत्रित प्रकल्प राबवण्यात येत आहे. या निगडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उद्घाटन कार्यक्रमाविषयी अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नसल्याने हा पूल वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहे.

बराच काळ रखडलेल्या निगडीतील बहुचर्चित उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण झाली असतानाही त्याचे उद्घाटन कोणी करायचे, यावरून सत्तारूढ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने संघर्षांची चिन्हे आहेत. उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे यावर कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडले असल्याचे दिसत आहे.

Google Ad

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री अजित पवार यापैकी कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे की दोघांनाही आमंत्रित करायचे याविषयी अद्याप एकमत झालेले नाही. पिंपरी पालिकेतील प्रकल्पांचे श्रेय घेण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत जुना वाद असून त्यांच्यात यापूर्वी अनेकदा संघर्ष झाल्याचे शहरवासीयांनी अनुभवले आहे. फडणवीस यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थित रहावे, असा प्रयत्न भाजप वर्तुळात सुरू आहे. तर राष्ट्रवादी पवारांसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

वाहतुकीसाठी पूल खुला होत नसल्याने नागरिकांमध्ये तसेच लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी आहे. तर उद्घाटनाच्या विलंबामुळे या मार्गावरून दररोज जाणाऱ्या लाखभर वाहनस्वारांना दीड ते अडीच किलोमीटरचा वळसा पडतो आहे. या रहदारीचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याने तातडीने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी नागरिक करत आहे. मात्र आता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनावर पुन्हा श्रेयवादाचे सावट आहे हे मात्र नक्की! नाहीतर रात्रीत अचानक उद्घाटन झाल्याचे समजले तर आचर्य वाटायला नको …

Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!