Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सोमवार दिनांक ७ जून २०२१ पासून पिंपरी चिंचवड महापालिके मार्फत प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी पिंपळे गुरव मधील … निळु फुले नाट्यगृहात नवीन लसीकरण केंद्र सुरु

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.०६जून) : सोमवार दिनांक ७ जून २०२१ पासून पिंपरी चिंचवड महापालिके मार्फत प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील ‘निळु फुले नाट्यगृहात’ नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात येत असुन सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन लसीकरण सुविधेचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, नगरसेविका सौ माधवी राजापुरे, नगरसेविक अंबरनाथ कांबळे यांनी केले आहे.

महापालिका प्रशासनाकडे मागणीच्या तुलनेत लस साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेत अडथळा निर्माण होत आहे. मात्र, नागरिकांनी संयम ठेवावा. नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण सुलभ व्हावे. यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे पाठपुरावा करून या भागात हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. नवीन लसीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरातील अबालवृद्धांची पायपीट थांबणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही नगरसेविका ‘माधवी राजापुरे’ आणि नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी केले आहे.

Google Ad

टीप :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाच्या सूचनेप्रमाणे साठा उपलब्ध होईल त्यानुसार नागरिकांना लस देण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!