महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : विज्ञान युगाच्या चर्चा करत असताना भौतिक सुखासाठी होणारी प्रचंड वृक्षतोड ही मानवाच्या भावी काळातील अधोगतीची चाहूल आहे. शहरात मोठया इमारती, रस्ते, सुशोभिकरण या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड ही आपण आपल्या पुढच्या पिढीला दिलेला शाप ठरणार असल्याने ती वाचली पाहिजे याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे जेष्ठ नागरिक अरुण चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
नवचैतन्य हास्ययोग परिवार तर्फे नवी सांगवी पिंपळे गुरव परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, आपल्या आयुष्यात कार्य करत असताना समाजाचे आपण काहीतरी देने लागतो या भावनेने नवचैतन्य हास्ययोग परिवार नेहमीच विविध समाजोपयोगी कार्य करत असतो, त्याचाच एक भाग म्हणून परिवारातील जेष्ठ नागरिक अरुण चौधरी यांचे वाढदिवसानिमित्त हे वृक्षारोपण करण्यात आले. आपला वाढदिवस लक्षात रहावा, भावी पिढीला त्याचा लाभ घेता यावा असे अरुण चौधरी म्हणाले, जेष्ठांचा हा आगळावेगळा उपक्रम असल्याने परिसरात त्याची चर्चा होत आहे.
यावेळी धनाजी कोल्हे, भानुदास गरुड, गणेश सुर्यवंशी, दिलीप वारके, गोटू शेंगदाणे यांचे शुभहस्ते पिंपळ वृक्ष लावण्यात आले. शनि मंदिर ते नवी सांगवी बसस्थानक परिसरात तसेच पी डब्लू डी मैदानात. अनेकांची उपस्थितीत होती..सर्वश्री अनिल लक्का, सुरेश पाटील, मधुकर पाटील, करांडे, भाऊसाहेब जाधव तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनाजी कोल्हे व भानुदास गरुड यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जून) :रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्य सन…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२३ जून) : चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात शंकरभाऊ जगताप यांनी महावितरणच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा सर्वात कळीचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : औंध जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या जिल्हा आयुष रुग्णालयात आज २१…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथील उद्योजक श्री.बबनराव बाबुराव…