महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जानेवारी) : भाजपचे चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होत असून ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी याकरिता भाजपमध्ये पक्षीय पातळीवर जोरदारपणे हालचाली सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या या दु:खातून जगताप कुटुंबीय आणि त्यांचे हितचिंतक अद्याप सावरलेले नाही. अल्पावधीत लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जगताप कुटुंबीयांसोबत राहीले पाहिजे. अशा प्रकारच्या भावना आज रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव येथे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात आयोजित ग्रामस्थ आणि नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोटनिवडणूक या विषयावर बोलताना अनेकांनी व्यक्त केल्या. नवी सांगवी-पिंपळे गुरव मधील नागरिकांनी राजकिय प्रवासात नेहमीच स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भरगोस अशी साथ दिली, त्यांच्या राजकिय प्रवासात त्यांना या भागाने आतापर्यंत प्रत्येक वेळा यश संपादन करून दिले.
नागरिकांच्या भावना :-
दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी घडवले. अनेकांना महानगर पालिकेच्या आणि पक्षाच्या माध्यमातून महत्वाची पदे दिली. त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केली.
पिंपरी- चिंचवड शहर घडवण्यात जगतापांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे सदसद्विवेकबुद्धीने विचार करून जगताप कुटुंबीयातून कोणत्याही उमेदवाराविरोधात आपला उमेदवार उभा करू नये अशी अपेक्षा आहे,
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानं जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा माणूस गमावला …
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीनं काम केलं. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनानं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान होतं. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तडफेनं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम पिंपरी-चिंचवड परिसरातील जनता कधीही विसरू शकणार नाही, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.
आपला ऋणानुबंध असाच कायम राहावा, आपण सर्वांनी एकसंघ राहणं हीच खरी भाऊंना श्रद्धांजली असेल … शंकर जगताप