महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू मिलिनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतून बधाने शुभ्रा धनंजय हिने 88.50 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक पुंड मानसी संदीप (86.33) तर तृतीय क्रमांक यादव तनिष्का दत्तात्रय (79.83) या विद्यार्थिनीने मिळवला. वाणिज्य शाखेतून जेस्टी इलसा वरुघीसी ही 81.50 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. द्वितीय क्रमांक पाटील वेदांती उमेश (80.67) तर तृतीय क्रमांक शिंदे आर्या बळीराम (80.50) हिने पटकावला.
संस्थेचे सचिव व आमदार शंकर जगताप, उपाध्यक्ष विजयअण्णा जगताप, संस्था सदस्य स्वाती पवार, मुख्याध्यापिका इनायत मुजावर यांच्यासह सर्व संस्था सदस्य, शिक्षकांनी या सर्व यशस्वी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे सचिव, आमदार शंकर जगताप सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत या विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…