महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.०२ जून ) : ” उत्तुंग यशाची परंपरा” प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, नवी सांगवीचा पुन्हा एकदा आठव्यांदा यशाची परंपरा राखत दणदणीत ९९.१९ टक्के निकाल लागला. यामध्ये पाचपुते श्रेया जितेंद्र ९६.२०% (प्रथम), देसाई रोशनी सुरेश ९४.८०% (द्वितीय क्रमांक), कोलते वेदांत आशुतोष ९३% (तृतीय क्रमांक) उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.१९% मिळवून दणदणीत यशाचे मानकरी ठरले.
१२४ मुलांपैकी ४९ मुलांनी डिस्टिंक्शन मिळवून ३९ मुले फर्स्ट क्लास मध्ये पास झाली. हे सर्व त्यांच्या कष्टाचे फळ,शिक्षकांचे मार्गदर्शन ,शाळेचे नियम, याचे फलित होय.याप्रसंगी पाचपुते श्रेया जितेंद्र हिने आपल्या शाळेला व शाळेतील शिक्षकांना यशाचे श्रेय दिले. तर देसाई रोशनी सुरेश हिने आपल्या यशाचे रहस्य उलगडताना दररोजचा अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन, व शाळेची शिस्त, यामुळे वेळोवेळी अभ्यासास संधी मिळाली. तर कोलते वेदांत आशुतोष यांने पालक, शाळा, शिक्षक, व शाळेची शिस्त या सर्वांमुळे मी यश मिळवू शकलो असे सांगितले.
‘दहावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर निवडीसाठी विविध मार्ग दिसू लागतात. या मार्गावरून पुढे जाण्यासाठी, आवडते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये संस्थेचे सचिव मा. शंकर जगताप यांनी दहावीच्या परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अभिनंदन करून भावी आयुष्यच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सोबत पालकांचे तोंड भरून कौतुक केले .
तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विजूअण्णा जगताप ,सदस्या स्वाती पवार , श्री देवराम पिंजन व सर्व संचालक मंडळ , प्राचार्यां इनायत मुजावर मॅडम यांनीही यशस्वी विध्यार्थीचे तोंड भरून अभिनंदन कौतुक केले. त्याचबरोबर त्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर वर्ग , यांचेही प्राचार्या इनायत मुजावरमॅडम यांनी कौतुक केले .
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागल आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.
गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करा अर्ज
दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यास विषयाची गुण पडताळणी करणे, उत्तरपत्रिकांची छायाप्रत मागवून पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन माध्यमातून स्वत:, शाळांमार्फत http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर पुढील पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. गुण पडताळणीसाठी दि. ३ ते १२ जून तसेच छायाप्रत मागविण्यासाठी दि. ३ ते २२ जूनपर्यंत या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. डेबीट, क्रेडिट कार्ड तसेच यूपीआय आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क भरता येणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…