रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूल च्या वतीने विध्यार्थीची  वृक्ष व ग्रंथ दिंडी उत्साहात साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जुलै) : रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूल च्या वतीने विध्यार्थीची  वृक्ष व ग्रंथ दिंडी सोशल डिस्टनसिंग पाळून उत्साहात साजरी करण्यात आली .

रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये सोशल डिस्टनसिंग पाळून आषाढी एकादशी निमित्त वृक्ष व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले .सर्व विद्यार्थिनी  वारकऱ्यांचा वेष  परिधान करून दिंडी मध्ये ज्ञानोबा माउली तुकारामचा  जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते .

संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार ,मुख्याध्यापिका आसावरी घोडके, सर्व शिक्षक , शिक्षकेतर व कर्मचारी ,सामाजिक कार्यकर्ते  पोपट नखाते यावेळी उपस्थित होते . सामाजिक कार्यकर्ते  पोपट नखाते यांच्या हस्ते  दिंडी व ग्रंथ पूजन करण्यात आले . विद्यार्थिनी संताचे भाषण , अभंग , गवळण , फुगड्या सादर केले .डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन विठू नामाचा जयजयकार केला. गळ्यात टाळ अडकवून  ‘ ज्ञानेश्वर माउली , ज्ञानराज माउली तुकाराम ‘ म्हणत  दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  रेणू राठी  आणि आभार केतकी पाटील यांनी केले .

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

21 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago