Google Ad
Editor Choice

Indapur : पुणे जिल्ह्यात कळपातील जवळपास 50 मेंढ्यांचा मृत्यू … तर मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जुलै) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर (एमआयडीसी) परिसरात चरावयास आणलेल्या कळपातील जवळपास 50 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच अजून जवळपास ३० ते ४० मेंढ्या अत्यवस्थ आहेत. या मेंढ्या दौंड तालुक्यातील गिरीम येथील मेंढपाळ भिवा रामा झिटे यांनी चरायला आणल्या होत्या. ही लक्षणे आढळून आली – मेंढपाळ झिटे हे गेली पंधरा दिवसांपासून इंदापूर परिसरात मेंढ्यांचा कळप घेऊन आहेत. मात्र, मंगळवार पासून मेंढ्यांचे कान सुजणे, डोळे सुजने, ताप अशी लक्षणे मेंढ्यांमध्ये आढळू लागली.

Google Ad

यानंतर या मेंढ्यांचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे यांनी वैद्यकीय डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी पाठवून इतर मेंढ्यांवर औषधोपचार सुरू केले आहेत. तर जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी सदरील ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.

ते म्हणाले की, सदरील घटना समजताच स्थानिक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांनी मेंढ्यांवर आवश्यक औषधोपचार सुरू केले आहेत. मेंढ्या कोणत्या कारणाने दगावल्या, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समजणार आहेत. हेही पुण्यातील भीषण आगीत लग्नासाठी आणलेले साहित्य नष्ट, 15 घरं जळून खाक काही दिवसांपूर्वी 24 बकऱ्यांचा मृत्यू – सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. या पावसादरम्यानच काही दिवसांपूर्वी वीज कोसळून याठिकाणी तब्बल 24 बकऱ्यांचा मृत्यू झाला.

वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात चरायला गेलेल्या बकऱ्यांवर वीज पडली आहे. यामुळे तब्बल 24 बकऱ्या जागीच ठार झाल्या आहेत. तर या घटनेत मेंढपाळ हा थोडक्यात बचावला आहे. ही घटना गिरडच्या बाबा फरीद टेकडी शिवारात घडली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!