महाराष्ट्र 14 न्यूज,( ता.३० मे) : ब्रिज भूषणशरण सिंह यांना अटक झालीच पाहिजे, खिलाडियों के सन्मान में राष्ट्रवादी मैदान मे, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर याच्या वतीने दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंना झालेल्या मारहाण व अटकेच्या निषेधार्थ आंदोलन घेण्यात आले. त्यामध्ये पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन मंगळवारी सकाळी घेण्यात आले.
शहराध्यक्ष प्रा.कविता आल्हाट म्हणाल्या की, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात सात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानंतर कुस्तीपटूंनी गेल्या २३ एप्रिल पासून जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. नव्या संसद भवनासमोर महिलांची खाप पंचायत करण्याची घोषणा कुस्तीपटूंनी केल्याने पोलिसांनी कुस्तीपटूंवर कारवाई केली, यात बजरंग पूनिया,विनेश फोगाट व साक्षी मलिक यांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत असताना दुसरीकडे भारतीय महिला कुस्तीपटू आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन घेत होते परंतु यांना संसद भवनाचे उद्घाटन करण्यातच जास्त रस दिसत होता. हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे खेळाडू जेव्हा देशासाठी पदक जिंकतात तिरंगा अंगा खांद्यावर घेऊन भाऊक होतात ,आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावतात, तेव्हा अभिमानाने उर भरून येतो. घडलेले दृश्य मान शर्मने झुकवणारे आणि अंतर्मुख होऊन पहायला लावणार आहे. लोकशाही कडून हुकूमशाही कडे वाटचाल होते की काय असे वाटायला लागले खेळाडूंच्या आंदोलनानंतर व कालच्या या घटनेनंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ब्रिज भूषण सिंग यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा नाहीतर क्रीडा संघटनेच्या वतीने व शहराच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन यापुढे घेण्यात येईल इशारा देण्यात आला.
यावेळी महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, महिला कार्याध्यक्ष सविता धुमाळ, लता ओव्हाळ, सामाजिक नेते देवेंद्र तायडे, व्हीजेएनटी सेल अध्यक्ष राजू लोखंडे, अर्बन सेल महीला अध्यक्ष मनीषा गटकळ, व्हीजेएनटी सेल महिला अध्यक्ष निर्मला माने, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष पूनम वाघ, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष ज्योती गोफणे, शहर संघटीका ज्योती निंबाळकर, चिंचवड विधानसभा संघटीका मीरा कदम, पिंपरी विधानसभा महिला कार्याध्यक्षा दिपाली देशमुख, महिला उपाध्यक्षा उषा उभारे, विजया काटे, उपाध्यक्ष आशा मराठे, सारिका हरगुडे, उपाध्यक्षा मेघा पळशीकर, शहर उपाध्यक्षा शोभा साठे, नीलम कदम, सुप्रिया जाधव, प्रवक्त्या पर्यावरण सेल ज्योती जाधव, अंकीता साबळे, सपना कदम, किरण शेगोकर, कामगार विभाग कार्याध्यक्ष युवराज पवार, सरचिटणीस राजन नायर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, शिरीष साठे, प्रदीप गायकवाड, संपत पाचुंदकर, बिरुदेव मोटे चिटणीस राजू चांदणे, विकी साठे, माजी सैनिक सेल प्रदेश उपाध्यक्ष पोपट पडवळ, कोमल भालेकर,रिझवाना शेख, आण्णा पाखरे, सरचिटणीस राजेश हरगुडे, रोहित जाधव, पंकज वाघमारे, संदीप शिंदे, युवक उपाध्यक्ष ओम क्षीरसागर, ऋषिकेश शिंदे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला जनतेने अभुतपूर्व…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झाले आहेत.…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…