Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का … नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाची लागण झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे आज शुक्रवारी दुःखद निधन झाले. आकुर्डी गावठाण मधून सतत तीन वेळा निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
नगरसेवक जावेद शेख यांना १६ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते.

परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. रुबी हॉल मधील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान, मागील चार ते पाच दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत उलट-सुलट चर्चा सुरु होती. अखेर आज नगरसेवक शेख यांची प्राणजोत मालवली.

Google Ad

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचे ४ जुलै रोजी कोरोनामुळे निधन झाले त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक एकनाथ थोरात, लक्ष्मण गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे शहराला हा खूप मोठा धक्का आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!