Google Ad
Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना काळं फासल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ नोव्हेंबर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं. नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते, याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुण्यात काळं फासलं आहे.

“आमच्याविरोधात कारवाई व्हायची ती होऊद्या. पण माझं म्हणणं आहे, शरद पवार यांच्याविषयी नामदेव जाधव सातत्याने विरोधात वक्तव्य करत आले आहेत. ते कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे, नाही तेव्हा शरद पवारांचे पाया पडायला यायचा. शरद पवारांवर टीका केली तर खपवून घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया एका आक्रमक कार्यकर्त्याने दिली. “शरद पवारांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या नामदेव जाधव यांना पुण्याच्या पत्रकार भवनाजवळ काळं फासण्यात आलं आहे”, अशी प्रतिक्रिया एका महिला कार्यकर्त्याने दिली.

Google Ad

नामदेव जाधव यांचा आज भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता. पण भंडारकर इन्स्टिट्यूटने ती परवानगी नाकारली. कायदा आणि सु्व्यवस्थेचं कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले होते. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार भवनसमोर जमले. नामदेव जाधव बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळं फासलं.

भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पर्यटनातून उद्योजकतेकडून असा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यात यावी. त्यासाठी भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी फी देखील ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमात नामदेव जाधव प्रमुख व्याख्याते असणार होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. ते भंडारकर इन्सिट्यूटच्या प्रवेशद्वारावरावर पोहोचले. ही बाब नामदेव जाधव यांच्या लक्षात आले. ते माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आले. पण तेव्हाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासल.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!