Google Ad
Editor Choice india

NBERecruitment : 12 वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने (NBE) ज्युनिअर असिस्टंट (Junior Assistant), सिनिअर असिस्टंट (Senior Assistant) आणि ज्युनिअर अकाउंटंट (Junior Accountant) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एनबीईकडून या संदर्भात नोटिफिकेशन (notification) काढण्यात आलं असून एकूण 42 रिक्त पदं भरली जाणार आहेत. 42 पैकी 30 पदं ज्युनिअर असिस्टंटसाठी आहेत. तर, सिनिअर असिस्टंटसाठी 8 आणि ज्युनिअर अकाउंटंटच्या 4 जागा भरल्या जाणार आहेत.

इच्छुकांना राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या http://natboard.edu.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज (online application) करावा लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2021 पासून सुरू होईल आणि 14 ऑगस्ट अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असेल.

Google Ad

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या भरतीसाठी कम्प्यूटर बेस्ड टेस्टच्या (CBT) आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेत 200 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण 200 गुणांची असे. तसेच हे प्रश्न सोडवण्यासाठी 180 मिनिटे म्हणजेच 3 तासांची वेळ दिली जाईल. यासह निगेटिव्ह मार्किंग (negative marking) होईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.

महत्वपूर्ण तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जुलै 2021
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2021

सीबीटी परीक्षा- 20 सप्टेंबर 2021
राष्ट्रीय परीक्षा बोर्डामध्ये रिक्त पदांचा तपशील
ज्युनिअर असिस्टंट- 30
सिनिअर असिस्टंट- 08
ज्युनिअर अकाउंटंट- 04
अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी – 1500 + 18% जीएसटी
एससी/एसटी/दिव्यांग/महिला – निशुल्क

शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर असिस्टंट- 12वी पास पाहिजे. तसेच कम्प्युटरबद्दल माहिती हवी. (विंडोज, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम, लॅप आर्किटेक्चर) याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
सिनिअर असिस्टंट- कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवीधर पदवी (Graduation).
ज्युनिअर अकाउंटंट- गणित (maths) आणि स्टॅटिस्टिक्स (Statistics) सोबत ग्रॅज्युएशनची डिग्री (graduation degree) तसेच एनबीईने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कॉमर्समध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा
उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 27 वर्ष असले पाहिजे. एससी, एसटी गटातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची आणि ओबीसी गटातील उमेदवाराला 3 वर्षांची सवलत देण्यात येईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

27 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!